पवननगर भागातील व्हॉल्व्ह मनपाने केला दुरुस्त

By Admin | Updated: November 7, 2015 23:23 IST2015-11-07T23:21:42+5:302015-11-07T23:23:23+5:30

पवननगर भागातील व्हॉल्व्ह मनपाने केला दुरुस्त

Fix the valve in the area of ​​Pavanagar area | पवननगर भागातील व्हॉल्व्ह मनपाने केला दुरुस्त

पवननगर भागातील व्हॉल्व्ह मनपाने केला दुरुस्त

सिडको : येथील पवननगर भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या व्हॉल्व्हमधून गेल्या तीन-चार दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर मनपा प्रशासनाने सदर व्हॉल्व्ह तातडीने दुरुस्त केला.
महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोत हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार सातत्याने घडत असतो. तसेच अनेक ठिकाणच्या व्हॉल्व्हमधून पाणी वाया जाणे, याबरोबरच पाइपलाइन गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकारही कायमच घडत असतात, परंतु यानंतरही मनपा अधिकारी मात्र याकडे डोळेझाक कारीत असल्याचे या आधीही उघड झाले आहे. पवननगर ते रायगड चौकदरम्यान हरिष हार्डवेअरसमोरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या चेंबरमधील व्हॉल्व्ह गेल्या तीन दिवसांपासून खराब झाल्याने यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. याबाबत शिवसेनेचे माजी सिडको उप विभागप्रमुख किरण शिंदे यांनी पाठपुरावा केला सिडकोतील मनपा अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे काही भागांत कमी दाबाने तर काही भागात मुबलक पाणीपुरवठा केला जातो. यामुळे मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्या भागात प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होतो त्या भागातील गल्लीबोळातील रस्त्यांवर सकाळच्या सुमारास पाण्याचा सडाच पडलेला दिसतो. याबाबतही महापौरांनी पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. एकूणच सिडको भागात पाणीपुरवठ्याबाबत नियोजन नसल्याने व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा अपव्यय यापुढेही होऊ शकतो. सिडकोतील सर्व नागरिकांना समसमान व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी व सिडकोतील कायमच होत असलेल्या पाणी गळतीवर नियंत्रण आणण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Fix the valve in the area of ​​Pavanagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.