पाच वर्षांच्या कार्तिक भावेचा जागतिक कीर्तिमान, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:38+5:302021-07-07T04:17:38+5:30

नाशिक : शहरातील अवघ्या पाच वर्षांच्या कार्तिक मिहिर भावे या विद्यार्थ्याने वेगवेगळ्या १५० देशांचे राष्ट्रध्वज व विविध राष्ट्रीय, ...

Five year old Karthik Bhave's world record, recorded in the India Book of Records | पाच वर्षांच्या कार्तिक भावेचा जागतिक कीर्तिमान, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

पाच वर्षांच्या कार्तिक भावेचा जागतिक कीर्तिमान, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

नाशिक : शहरातील अवघ्या पाच वर्षांच्या कार्तिक मिहिर भावे या विद्यार्थ्याने वेगवेगळ्या १५० देशांचे राष्ट्रध्वज व विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कारची केवळ लोगो बघून ओळख करून देत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२१ मध्ये आपले नाव कोरून जागतिक कीर्तिमान स्थापन केला आहे.

कार्तिक सध्या त्याच्या आईवडिलांसोबत पुण्यात राहत असून पुण्यातीलच एका शाळेत तो पूर्वप्राथमिकचे शिक्षण घेत आहे. त्याच्यात लहानपणापासूनच घरातील संस्कार घेत संस्कृत श्लोक, वेगवेगळ्या देशांचे भौगोलिक स्थान, मार्ग, वाहने, याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्याच्यातील या गुणांना त्याची आई प्रियंका व वडील मिहीर भावे यांनी प्रोत्साहन देत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशे व माहिती उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे त्याचे नाशिकचे आजी-आजोबा संजीवनी व दीपक भावे, तसेच जळगावचे आजी-आजोबा विजया व संदीप कुलकर्णी यांनी त्याला घरातील संस्कारातून विविध वाद्य व संस्कृत श्लोकांची शिकवण दिली. आई प्रियंका यांनी त्याची पियानोच्या स्वरांची तयारी करून घेतली. त्याचे हे सर्व व्हिडीओ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी पाठविले असता या कलागुणांची दखल घेऊन त्याच्या विविध कामगिरींबाबत कार्तिकचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२१ मध्ये नोंदविण्यात आले. अशा विविध गोष्टींमधील उत्तम कामगिरीसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून कार्तिकला मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

---

कार्तिक दोन वर्षे होईपर्यंत त्याच्या आजी-आजोबांनी त्याची संस्कृत श्लोक व सामान्य ज्ञान या विषयांची तयारी करून घेतली. त्यानंतर तो आमच्यासोबत पुण्यातच आहे. येथे त्याची आई त्याच्याकडून पियानो, जागतिक व राष्ट्रीय नकाशे याविषयी तयारी करून घेते. मुळात कार्तिकमध्येच नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असल्याने त्याला हे यश मिळू शकले आहे.

- मिहिर भावे, कार्तिकचे वडील

--

कार्तिकला लहानपणापासूनच विविध गोष्टींची ओळख पटवून सांगण्याची आवड होती. त्याची आई आणि वडिलांनी त्याचा हा कलागुण ओळखून त्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय भौगोलिक स्थळे, विविध देशांचे राष्ट्रध्वज याविषयी माहिती देत त्याची तयारी करून घेतली होती. कार्तिकमध्ये नवीन गोष्टी जाणून घेण्याची, त्याविषयी सखोल माहिती घेण्याची उत्सुकता असून तो नवीन गोष्टी तत्काळ आत्मसात करतो. त्यामुळेच त्याला हे यश मिळू शकले आहे.

- संदीप कुलकर्णी, चिटणीस, ब्राह्मण सभा जळगाव

050721\05nsk_46_05072021_13.jpg

कार्तिक भावे

Web Title: Five year old Karthik Bhave's world record, recorded in the India Book of Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.