शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पत्त्याच्या इमल्यासारखे पाच वाडे रात्री एकाचवेळी कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:02 IST

रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नाव दरवाजा परिसरात पाच वाडे ढासळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याहीप्रकारे मनुष्यहानी झाली नाही.

ठळक मुद्देपंधरवड्यात जुने नाशिक भागात सुमारे १८ ते २० वाडे व १५ भींती पडल्याची नोंदया वाड्यांच्या भींती सामायिक या दुर्घटनेत कोणत्याहीप्रकारे मनुष्यहानी झाली नाही.

नाशिक : संततधार पावसामुळे वाडे कोसळण्याची मालिका जुन्या नाशकात सुरूच असून सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नाव दरवाजा परिसरात पाच वाडे ढासळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याहीप्रकारे मनुष्यहानी झाली नाही.दरम्यान, सकाळी पाटील गल्ली येथील भांगरेवाड्याचा काही भग कोसळला. त्यामुळे दिवसभरात एकूण सहा वाडे जुने नाशिक भागात पडले.या पंधरवड्यात जुने नाशिक भागात सुमारे १८ ते २० वाडे व १५ भींती पडल्याची नोंद अग्निशामक दलाकडे आहे तर परसिरात या दोन दिवसांत सुमारे दहा ते पंधरा वाड्यांचे भाग कोसळल्याची तक्रार नगरसेवक शाहू खैरे यांनी केली तसेच या संदर्भात मनपा अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोपही खैरे यांनी केला.रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नावदरवाजा येथे अरूंद गल्लीत असलेला भालेराव वाड्याचा मोठा भाग कोसळला. पडलेल्या भींतींचा मलबा शेजारच्या वाड्यांवर पडून बोळीतील अन्य चार वाडेदेखील ढासळले. यामध्ये कुलकर्णी, दिक्षित वाड्यांचाही समावेश आहे. या वाड्यांच्या भींती सामायिक असून एकमेकांना हादरा बसल्याने वाडे पत्त्याच्या इमल्यासारखे कोसळले. पडक्या वाड्यासंदर्भात महापालिका क्लस्टर योजना राबवित असून त्यासाठी आघात मुल्यमापन अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच हा विषय मार्गी लागणार असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान फायरमन श्याम राऊत, राजेंद्र पवार, उदय शिर्के, सुहास अभंग यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरूवात केली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवीतहानी झाली नाही. या वाड्यांमध्ये कोणी राहत नव्हते. हे सगळे वाडे पडके झाले होते.

 

टॅग्स :NashikनाशिकNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दल