कुऱ्हेगावजवळील अपघाती वळणाचे आतापर्यंत पाच बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:03+5:302021-07-04T04:11:03+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली-गोंदे दुमालाकडे जाणाऱ्या कुऱ्हेगावजवळील आत्तापर्यंत सर्वाधिक धोकादायक ठरलेल्या रस्त्यावरील वळणाने आत्तापर्यंत पाच बळी घेतले आहे. ...

Five victims of accidental turn near Kurhegaon so far | कुऱ्हेगावजवळील अपघाती वळणाचे आतापर्यंत पाच बळी

कुऱ्हेगावजवळील अपघाती वळणाचे आतापर्यंत पाच बळी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली-गोंदे दुमालाकडे जाणाऱ्या कुऱ्हेगावजवळील आत्तापर्यंत सर्वाधिक धोकादायक ठरलेल्या रस्त्यावरील वळणाने आत्तापर्यंत पाच बळी घेतले आहे. अनेक जण या ठिकाणी दुचाकी सरकल्यामुळे गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच अस्वली येथील एका २२ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडली.

या रस्त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नयना गावित, माजी आमदार निर्मला गावित, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, राजाराम नाठे आदींनी या ठिकाणी भेट दिली. नयना गावित यांनी तातडीने शाखा अभियंता एन. आर. पाटील यांना या ठिकाणी रस्त्यावर रेडियमयुक्तपट्ट्या लावून त्या ठिकाणी पुन्हा अपघात होणार नाही, अशी व्यवस्था करण्याची सूचना दिली. इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला-अस्वली रस्त्यावरील कुऱ्हेगावजवळ असलेल्या धोकादायक वळणाने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले असून सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात येऊन या ठिकाणी रात्रीच्या वेळी येत-जात असलेल्या नागरिकांना सदर वळण दार रस्ता दूरवरून दिसेल अशी सोय करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर गावित यांनी घटनास्थळाची पाहणी करत तातडीने शाखा अभियंता एन. आर. पाटील यांना आदेश देत या ठिकाणी रेडियमयुक्त पट्ट्या किंवा बॅरिकेट्स लावण्याच्या सूचना दिल्या.

------------------------

कामगारांची गैरसोय

अस्वली-गोंदे दुमाला या रस्त्याने नेहमीच गोंदे औद्योगिक वसाहतींमध्ये कामगार रात्री-अपरात्री रोजगारासाठी जात असतात. तसेच दुग्ध व्यवसायिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी आदींची या रस्त्यावरून नेहमीच ये-जा सुरू असते यामुळे या ठिकाणी पुन्हा अपघात होणार नाही यासाठी सोय करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

याप्रसंगी वाडिवऱ्हे गणप्रमुख आंबादास धोंगडे, जानोरीचे सरपंच अर्जुन भोर, ज्येष्ठ नागरिक नामदेव धोंगडे, सतीश धोंगडे, राजाराम धोंगडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

गोंदे दुमाला-अस्वली रस्त्यावरील कुऱ्हेगावजवळ असलेल्या वळणदार रस्त्याची पाहणी करताना जिल्हा परिषद सदस्य नयना गावितसमवेत माजी आमदार निर्मला गावित, सभापती सोमनाथ जोशी, निवृत्ती जाधव, राजाराम नाठे आदींसह ग्रामस्थ. (०३ नांदूरवैद्य १)

030721\03nsk_8_03072021_13.jpg

०३ नांदूरवैद्य१

Web Title: Five victims of accidental turn near Kurhegaon so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.