शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

पैशांचा पाऊस! 'एटीएम'मधून निघाली पाचपट रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:52 AM

विजयनगर येथील एका खासगी बँकेच्या एटीएम मशीनमधून एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला चक्क पाचपट रक्कम म्हणजे पाच हजार रुपये मिळत असल्याने पैसे काढण्यासाठी सिडको परिसरातील नागरिकांनी सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मोठी गर्दी केली होती.

सिडको (नाशिक) : विजयनगर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम मशीनमधून एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला चक्क पाचपट रक्कम म्हणजे पाच हजार रुपये मिळत असल्याने पैसे काढण्यासाठी सिडको परिसरातील नागरिकांनी सोमवारी (18 जून) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मोठी गर्दी केली होती. याबाबतची माहिती बँकेच्या प्रशासनाला कळेपर्यंत ग्राहकांनी तब्बल दोन लाख ६८ हजार रुपयांची रक्कम काढली असल्याचे समजते. सिडकोतील विजयनगर येथे अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम मशीन  बसवण्यात आले असून या एटीएममध्ये सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास या मशीनमध्ये बँकेच्या वतीने रक्कमेचा भरणा करण्यात आला.

त्यानंतर काही ग्राहकांनी रक्कम काढली. मात्र रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास एटीएममध्ये अंतर्गत बिघाड झाल्याने ग्राहकांना १ हजार रुपये काढायचे असल्यास ५ हजार रुपयांची रक्कम मिळू लागली होती. ही घटना कानोकानी अनेक ग्राहकांनी या एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. त्याच वेळी बँक ग्राहक अमोल गोलाईत हे ४ हजार रुपये काढण्यासाठी गेले असताना त्यांना २० हजार रुपये हाती आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ अ‍ॅक्सिस बँकेच्या प्रशासनाला याबाबत कळविले असता बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण भिसे या एटीएम केंद्रावर गेले.

त्यांनी याबाबत पोलिसांना तात्काळ कळविले असता याठिकाणी पोलीस दाखल झाले. याचवेळी ग्राहकांची गेथे गर्दी झाल्याने एटीएम केंद्र बंद करून गर्दी हटविण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी (19 जून) चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या प्रकारामुळे सुमारे २ लाख ६२ हजार रुपये एटीएममधून निघाल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :atmएटीएम