पाच हजारांचा सहभाग : मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठक
By Admin | Updated: September 17, 2016 22:31 IST2016-09-17T22:31:30+5:302016-09-17T22:31:53+5:30
चिराई येथे कॅँडल मार्च

पाच हजारांचा सहभाग : मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठक
नामपूर : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत. नाशिक जिल्ह्याचा मराठा क्रांती मोर्चा येत्या २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून, बागलाण तालुक्यात ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावागावात बैठका सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर चिराई गावातून सुमारे पाच हजार समाज बाधवांतर्फे कॅँडल मार्च काढण्यात आला.
सरपंच शकुंतला पाटील, अशोक सावंत, खेमराज कोर, नानाजी दळवी, यतिन पगार, दीपक पगार, शैलेश सूर्यवंशी, प्रकाश निकम, डॉ. भास्कर भामरे, प्रशांत सोनवणे, डॉ. शेषराव पाटील, विनोद पाटील, भाऊसाहेब अहिरे, मधुकर देवरे, अरविंद सोनवणे, बाळासाहेब भदाणे, काकाजी रौंदळ, राजू ठाकरे, हेमंत ठाकरे, अशोक ठाकरे, गंगाधर अहिरे, ज.ल. पाटील, डॉ. सीताराम सोनवणेंसह अनेक नेते उपस्थित होते. गावाला यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते.
गावातील माध्यमिक शाळेतील स्काउट - गाइडच्या स्वयंसेवक सर्वांना मार्गदर्शन करीत होते. शेवटी गावातील चौकात कॅँडल मार्चचे रूपांतर सभेत झाले. यात सर्व मान्यवर नेत्यांनी २४ सप्टेंबरचा क्रांती मोर्चाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी दोन मुलींनीदेखील भाषण केले. डॉ. शेषराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी, तर आभार तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर अहिरे यांनी
मानले. सभेच्या शेवटी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ व कोपर्डी घटनेतील बालिकेस श्रद्धांजली अर्पण करून मराठा एकजुटीचा विजय असो असा घोषणा देण्यात दिल्या. (वार्ताहर)