शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका हद्दीत पाच हजार मुलांना डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:34 IST

मिझल रु बेला लसीकरण कार्यक्रम महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार असून, महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते म्हसरूळ मनपा शाळा क्र मांक एक येथे करण्यात आले. या कार्र्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी आयुक्त राधाकृष्णन, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेते दिनकर पाटील आदींबरोबरच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गायकवाड, शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे, शाळेच्या मुख्याध्यापक लीलावती गायकवाड उपस्थित होते.

नाशिक : मिझल रु बेला लसीकरण कार्यक्रम महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार असून, महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते म्हसरूळ मनपा शाळा क्र मांक एक येथे करण्यात आले. या कार्र्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी आयुक्त राधाकृष्णन, स्थायीसमिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेते दिनकर पाटील आदींबरोबरच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गायकवाड, शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे, शाळेच्या मुख्याध्यापक लीलावती गायकवाड उपस्थित होते.सदरची मोहीम पुढील पाच आठवडे राबविण्यात येणार असून, त्यापैकी तीन आठवडे शालेय लसीकरणामध्ये व उर्वरित दोन आठवडे बाह्य लसीकरण सत्रांमध्ये म्हणजे अंगणवाडी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र इ. ठिकाणी दिली जाईल. त्याचप्रमाणे पुढील पाच आठवडे मनपा अंतर्गत सर्व रु ग्णालय व आरोग्य केंद्रांमध्ये नियोजित लसीकरण सत्रांद्वारे ही लस दिली जाणार आहे. महानगरपालिकेतील आरोग्य पथक या सर्व ठिकाणी जाऊन नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटापर्यंतच्या सर्व बालकांना गोवर-रु बेला लस देणार आहे. मंगळवारी (दि.२७) पहिल्याच दिवशी शाळा व नियोजित लसीकरण सत्रे मिळून एकूण पाच हजार ३७० मुलांना लसीकरण करण्यात आले. सदर लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील पाल्यांना लस देऊन गोवर-रु बेला या रोगाच्या निर्मूलनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक