दुचाकी जळीत प्रकरणी पाच संशयितांना अटक
By Admin | Updated: April 10, 2016 23:52 IST2016-04-10T22:53:05+5:302016-04-10T23:52:23+5:30
दुचाकी जळीत प्रकरणी पाच संशयितांना अटक

दुचाकी जळीत प्रकरणी पाच संशयितांना अटक
नाशिक : शरणपूर रोडवरील हेरंब रेसिडेन्सीमधील दुचाकी जळीत प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी सहा संशयितांपैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे़ मागील भांडणाच्या रागातून हे कृत्य केल्याची कबुली या संशयितांनी पोलिसांकडे दिली आहे़
कॅनडा कॉर्नरजवळील हेरंब रेसिडेन्सीतील रहिवासी रॉनी विलास पवार यांचे शरणपूरमधील संशयित जॅक्शन शरद भोसले, जॉर्ज संजय साळवे, शरद चंद्रमणी उगले, निखिल संजय साळवे, रोहित नपारे, विराज उदय साकरपेकर यांच्यासोबत पूर्वी भांडण झाले होते़ या भांडणाच्या रागातून हेरंब सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दोन पल्सर (एमएच १५, एफए ४९१२ व एमएच ०२, व्हीएम १२६३), व अॅक्टिवा (एमएच १५, ईएम ५८८८) अशा तीन वाहनांना आग लावली होती़
सरकारवाडा पोलिसांनी या संशयितांपैकी विराज उदय साकर्पेकर वगळून उर्वरित पाचही जणांना अटक केली आहे़ (प्रतिनिधी)