युवकांचे अपहरण करून लुटणाऱ्या पाच संशयितांना अटक
By Admin | Updated: August 18, 2016 00:57 IST2016-08-18T00:56:37+5:302016-08-18T00:57:31+5:30
युवकांचे अपहरण करून लुटणाऱ्या पाच संशयितांना अटक

युवकांचे अपहरण करून लुटणाऱ्या पाच संशयितांना अटक
नाशिक : मायको सर्कल परिसरातील दोन युवकांचे अपहरण करून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत २५ हजारांची लूट करणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे़ मंगळवारी ही घटना घडली.
म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश चंदुलाल जैन (२८ रा. परिमल अपार्टमेंट, मायको सर्कल) व त्यांचा मित्र अनिल सूर्यवंशी हे दोघे साडेअकरा वाजेच्या सुमारास घराजवळ उभे होते़ त्यावेळी वाहनातून आलेले संशयित सागर किशोर कुवर (२७ रा. मोतीबाग नाका, मालेगाव), संदीप शांतीलाल वाघ (३५, रा. ओम निवास), प्रशांत रघुनाथ गांगुर्डे (३० रा. सुदर्शन कॉलनी, दत्तनगर), ललित दिनकर चौधरी (३७ रा. गोटीराम गल्ली, रविवार कारंजा) व अनिल पुंडलिक पाटील (४० रा. लिबर्टी पॅलेस, गंगापूररोड) यांनी या दोघांना बळजबरीने गाडीत बसविले़ यानंतर संशयितांनी जैन व सूर्यवंशी यांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील ओसाड जागेवर नेऊन बेदम मारहाण केली़ तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देऊन या दोघांच्या खिशातील एटीएम कार्डद्वारे २५ हजार रुपये काढून घेतले़ अपहृत दोघा युवकांनी संशयितांच्या तावडीतून सुटका करून घेत म्हसरूळ पोलीस ठाणे गाठले व आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी संशयितांचा शोध घेऊन त्यातील पाच जणांना अटक केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपहरण आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.