शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
4
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
5
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
6
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
7
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
8
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
9
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
10
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
11
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
12
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
13
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
14
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
15
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
16
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
17
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
18
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
19
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
20
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

बारा दिवसांत पाच सोनसाखळ्या लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:36 IST

परिसरातील रस्त्यांवरून महिलांना भरदिवसा पायी फिरणे मुश्कील झाले आहे. कधी कोणता भामटा दुचाकीवरून येईल अन् गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा करेल, या धास्तीने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसले आहे.

इंदिरानगर : परिसरातील रस्त्यांवरून महिलांना भरदिवसा पायी फिरणे मुश्कील झाले आहे. कधी कोणता भामटा दुचाकीवरून येईल अन् गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा करेल, या धास्तीने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसले आहे. या महिनाभरात सोनसाखळी चोरीच्या या भागात सर्वाधिक पाच घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये २ लाख २ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत.पहिली घटना राजीवनगर भागात घडली. चोरट्यांनी अत्यंत धाडसी पद्धतीने व नेहमीपेक्षा वेगळ्या रीतीने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. फ्लॅटचा दरवाजा ठोठावून दरवाजा उघडण्यासाठी आलेल्या मीनाक्षी केसरकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटे इमारतीतून फरार झाले होते, ते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तसेच दुसरी घटना चार दिवसांच्या अंतराने पुन्हा घडली. राणेनगरकडून राजीवनगरच्या दिशेने प्रमिला सुभाष झेंडे या सकाळी दहा वाजेच्या सुमारास पायी जात होत्या. जाजू शाळेजवळ समोरून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून पळ काढला, याबाबत पोलीस अजूनही तपास करत आहेत. तिसरी घटना शुक्रवारी (दि.१७) चार्वाक चौक परिसरात पुन्हा घडली.चोरट्यांनी दुचाकीवरून येत लता करपे नावाच्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. या घटनेचा तपास सुरू होत नाही तोच रविवारी (दि.१९) पुन्हा चोरट्यांनी पोलिसांना आव्हान देत चार्वाक चौकातच सुवर्णा घोलप नावाच्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबविले. या घटनेला दोन दिवस होत नाही तोच पुन्हा गजानन महाराज मंदिराजवळ चार्वाक चौकापासून काही मीटर अंतरावर मंगळवारी (दि.२१) सुनीता चंद्रकांत दुसाने (४५) यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळविले.पोलीस गस्त असूनही चोरटे मोकाटया पाच घटना केवळ बारा ते पंधरा दिवसांत घडल्या असून, महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इंदिरानगर भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असून, या भागात महिला वर्ग सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडतो. पोलिसांकडून कान-नाक समिती, निर्भया पथक, पायी पेट्रोलिंग, साध्या वेशातील पोलिसांची गस्त असे विविध उपक्रम सुरू असूनदेखील इंदिरानगरमध्ये घडणारे गुन्हे कमी होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लागोपाठ घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांनी इंदिरानगरवासी हादरले आहेत.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय