‘ते’ पाच सेंकद!

By Admin | Updated: July 10, 2014 01:00 IST2014-07-09T22:20:16+5:302014-07-10T01:00:09+5:30

‘ते’ पाच सेंकद!

Five seconds! | ‘ते’ पाच सेंकद!

‘ते’ पाच सेंकद!


नाशिक, दि. ९ : सकाळी दहा - साडेदहाची वेऴ़क़ुणाला आॅफि स गाठायचे आहे तर कुणाला दुकान उघडायचे आहे़़क़ुणाला कॉलेजचा उशीर झालाय़़़तर कुणाची ट्रेन सुटायची वेळ जवळ आली आहे़ त्यामुळे प्रत्येक जण घाईत आहे़़़ परंतु रस्त्यावर वाहनांची तुडुंब गर्दी़़़त्यात पुन्हा वाहतूक सिग्नलचा व्यत्यय़़़वेळ चुकवायची नाही म्हणून वाहनांचा वेग वाढलेलाच़ पुन्हा पुढच्या चौकात सिग्नल पडतो़़़सगळे लक्ष टायमरकडे़़़छे़़़किती वेळ घेताहेत हे आकडे़़़? सिग्नल ग्रीन व्हायला शेवटचे पाच सेकंद उरलेले़़़पण संयम संपतो, वाहन पुढे दामटले जाते़़़ दुसरा सिग्नल अद्याप बंद झालेला नसतो अन् धाडकन् दोन वाहने एकमेकांवर धडकतात़ शहरातील कोणत्याही सिग्नलवर सकाळी व संध्याकाळी पिक अवर्समध्ये दिसणारे हे चित्र आपण रोज बघतो पण त्या शेवटच्या पाच सेकंदासाठी जीव धोक्यात टाकण्याचे प्रकार मात्र काही कमी होत नाहीत़ पाच सेकंद वाचवायचे की आयुष्य याचा निर्णय आता ज्याने-त्याने घ्यायचा आहे़

Web Title: Five seconds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.