पाच मेंढ्यांसह कोकरूठार

By Admin | Updated: September 5, 2015 21:42 IST2015-09-05T21:39:33+5:302015-09-05T21:42:20+5:30

जायखेडा : बिजोटे शिवारात हिंस्त्र प्राण्याचा वावर

The five rams' skulls | पाच मेंढ्यांसह कोकरूठार

पाच मेंढ्यांसह कोकरूठार

जायखेडा : बागलाण तालुक्यातील बिजोटे शिवारात दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात हिंंस्र प्राण्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करत पाच कोकरांना ठार केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिजोटे शिवारातील पोपट केदा बच्छाव यांच्या गट क्रमांक १६९ मध्ये सोनू पुनाजी गोवेकर यांच्या मेंढ्या काही दिवसांपासून चढाईसाठी बसविल्या आहेत. नेहमीप्रमाणे मेंढ्यांचे कोकरू त्यांच्या बांधलेल्या पालमध्ये सुरक्षित ठेवून मेंढ्यांचा कळप डोंगरकडेला गेला होता. मात्र दुपारी ४ वाजेच्या सुमारास हिंस्र प्राण्याने मेंढ्यांच्या पाच कोकरूंवर हल्ला चढवून त्यांना ठार केले. तसेच एका बोकडाला जखमी केले. याबाबत आखतवाडेचे माजी सरपंच किशोर ह्याळीज यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. वनविभागाचे वनपाल एल. पी. शेंडगे, वनरक्षक डी. आर. बागुल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सदर हल्ला हा लांडग्याने केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
परिसरातील जंगलात बेसुमार होत असलेली वृक्षसंपदा, वनसंपत्तीचा ऱ्हास व पर्जन्यमानाने फिरवलेली पाठ यामुळे येथील जंगलातील वन्यप्राणी पाणी व अन्नाच्या शोधात नागरी वस्तींकडे धाव घेत आहेत. त्यातून अशा दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढत आहे. वनविभाग वनसंपत्ती जपण्यासाठी प्रत्यक्ष व प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याऐवजी उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहे. त्यामुळे बागलाण तालुक्यातील वनसंपदा नष्ट होण्यासोबत वन्यप्राण्यांनी नागरी वस्तीवर हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच आखतवाडे येथील मुरलीधर निंबा ह्याळीज यांच्या मालकीच्या बकरीस हिंस्र प्राण्याने हल्ला चढवून ठार केले होते. तालुक्यात हिंस्र प्राण्यांचा सुळसुळाट वाढला असून, त्यात मुक्या प्राण्यांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे वनविभागाने वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कठारे कारवाई करावी, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: The five rams' skulls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.