पाच खासगी बसेस जळून खाक

By Admin | Updated: April 22, 2016 01:27 IST2016-04-22T01:25:30+5:302016-04-22T01:27:19+5:30

औरंगाबाद रोडवरील प्रकार : मध्यरात्रीची घटना; नागरिकांत घबराट

Five private buses burnt down | पाच खासगी बसेस जळून खाक

पाच खासगी बसेस जळून खाक

 नाशिक : औरंगाबाद रोडवरील संत जनार्दन स्वामी आश्रमासमोर असलेल्या एचएएलच्या मोकळ्या वाहनतळावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसला गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमाराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत जवळपास पाच बसेस जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. बसेसना आग लागल्याची घटना कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत सव्वा तासात आग आटोक्यात आणली. या घटनेबाबत आडगाव पोलिसांत अकस्मात जळीतची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, औरंगाबाद रोडवरील संत जनार्दन स्वामी आश्रमासमोर असलेल्या मोकळ्या पटांगणात एचएएल कंपनी कामगारांना सोडण्यासाठी खासगी बसचे कॉन्ट्रॅक्ट असून, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमाराला नेहमीप्रमाणे बसेस उभ्या असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अचानक एका बसने पेट घेतल्याचे सुरक्षारक्षक उत्तम वीर यांच्या निदर्शनास आले. काही क्षणातच अन्य उभ्या असलेल्या बसेसने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. वीर यांनी तत्काळ अग्निशमन दल व पोलिसांना माहिती कळविली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान बंबांसह दाखल झाले. त्यांनी एक ते दीड तासांत शर्थींचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. रात्रीच्या वेळी आग लागल्याची घटना घडल्याने या बस कोणी पेटविल्या की तांत्रिक बिघाडामुळे त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या, याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झाली नाही.
या घटनेत एमएच १५, एके १११५, एमएच १५, एफइ ८०१, एमएच १५, एफइ ४५०, एमएच १५, एफइ ४५९, एमएच १५, एफइ ५४९ या पाच बसेस जळून खाक झाल्या आहेत. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Five private buses burnt down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.