लॉकरमध्ये सव्वापाच किलो सोने

By Admin | Updated: May 17, 2016 00:29 IST2016-05-17T00:19:41+5:302016-05-17T00:29:02+5:30

केबीसी फसवणूक : आतापर्यंत १४ किलो सोने, चांदी जप्त

Five pounds of gold in the locker | लॉकरमध्ये सव्वापाच किलो सोने

लॉकरमध्ये सव्वापाच किलो सोने

नाशिक : राज्यभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले केबीसीचे प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्या बँकेतील सहाव्या लॉकरमध्ये सोमवारी (दि़ १५) १ कोटी ५९ लाख रुपये किमतीचे ५ किलो ३०० ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले़ आर्थिक गुन्हे शाखेने चव्हाण दाम्पत्याच्या लॉकरमधून आतापर्यंत १३ किलो ९६५ ग्रॅम सोने व २ किलो ३०० ग्रॅम चांदी असा ऐवज जप्त केला आहे़
केबीसी मल्टिट्रेड अ‍ॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचा प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब व आरती चव्हाण यांनी गुंतवणूकदारांना तिप्पट रकमेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले़ मात्र गुंतवणूकदारांना परतावा न देता त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसीच्या संचालकांवर एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ या गुन्ह्णामध्ये सिंगापूरला फरार झालेल्या चव्हाण दाम्पत्यास पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली़
भाऊसाहेब चव्हाणने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पाचव्या लॉकरची तपासणी करण्यात आली़ मात्र त्यामध्ये काहीही आढळून आले नाही़ यानंतर त्याने नाशिक मर्चंट को-आॅपरेटिव्ह बँकेतील लॉकरची माहिती दिली असता या लॉकरची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये १ कोटी ५९ लाख रुपयांचे सोने आढळून आले आहे़ पोलिसांनी आतापर्यंत केबीसीची ८० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती़ तसेच चव्हाण दाम्पत्यास अटक केल्यानंतर त्यांच्या शहरातील विविध बँकांमधील लॉकरमधून सोन्या-चांदीचे दागिने शोधून काढले आहेत़ दरम्यान, पोलिसांकडून केबीसीची कागदपत्रे व हार्ड डिस्कमधून माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Five pounds of gold in the locker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.