शहर, जिल्'ातील विविध अपघातात पाच जण ठार
By Admin | Updated: May 17, 2015 01:37 IST2015-05-17T01:36:29+5:302015-05-17T01:37:06+5:30
शहर, जिल्'ातील विविध अपघातात पाच जण ठार

शहर, जिल्'ातील विविध अपघातात पाच जण ठार
नाशिक : शहर परिसरात विविध ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ मखमलाबाद रोडवरील कोठुळे मळा परिसरात बिगारी काम करीत असताना चक्कर येऊन पडल्याने सुरेश रमेश मिसाळ (२२) या युवकास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ खेरकर यांनी तपासून मयत घोषित केले़ दुसरी घटना फुलेनगर परिसरातील श्रीराम झोपडपट्टीसमोर घडली़ बेबी सुभाष वानखेडे ही महिला आपल्या राहत्या घरी ४० टक्के भाजल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला़ या दोन्ही घटनांची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ तिसरी घटना पंचवटीतील भावबंधन मंगल कार्यालयात घडली़ पुतण्याच्या विवाहासाठी आलेले सिन्नर येथील महेश त्र्यंबक खेडलेकर (३७) हे चक्कर येऊन पडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ पाटील यांनी मयत घोषित केले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ चौथी घटना वणी-सापुतारा रोडवर घडली़ दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथील चिंधू विठोबा वटाणे (४२) हे शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात होते़ एका भरधाव कारने त्यांना धडक दिल्याने ते गंभीर झाले़ त्यांना १०८ अॅम्बुलन्सकारने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ राहुल पाटील यांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पाचवी घटना मनमाडजवळील कुंदलगाव येथे घडली़ देवळा तालुक्यातील कुंभार्डे येथील रहिवासी एकनाथ त्र्यंबक ठाकरे (५५) हे शुक्रवारी (दि़१५) दुपारच्या सुमारास दुचाकीने जात असताना त्यांचा अपघात झाला़ यामध्ये डोक्यास गंभीर मार लागल्याने प्रथम मालेगाव येथील खासगी रुग्णालय व नंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ राहुल पाटील यांनी तपासून मयत घोषित केले़ या अपघाताची चांदवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)