शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात अवघा पाच टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 15:56 IST

पाणीसंकट गडद : मान्सूनचे आगमन लांबल्याने बळीराजा चिंतेत

ठळक मुद्देपावसाने येत्या दहा-पंधरा दिवसात समाधानकारक हजेरी न लावल्यास पाणीसंकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे

नाशिक : मृग नक्षत्र दुसऱ्या चरणाच्या अंतिम टप्प्यात पोहोचले तरी जिल्ह्यात अद्याप मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली नाही, त्यामुळे खरीपाच्या पेरणीसाठी सज्ज असलेल्या बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा पाच टक्के पाणीसाठा उरला असून ग्रामीण भागात दिवसेंदिवस पाणीसंकट अधिक गडद होत चालले आहे.जिल्ह्यात दुष्काळाची धग अधिक तिव्र बनत चालली आहे. सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांमध्ये जनावरे दाखल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ठिकठिकाणी विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत तर टॅँकरने केला जाणारा पाणीपुरवठाही अपुरा ठरू लागला आहे. पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत असतानाच पावसाने मात्र वक्रदृष्टी केली आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन सहा दिवस उलटले तरी अद्याप समाधानकारक पावसाची चिन्हे दिसेनात. त्यातच अजून मान्सून येऊन धडकला नसल्याने खरीपाची पेरणीही खोळंबली आहे. जिल्ह्यात जून महिन्यात पावसाची सरासरी १५४.९७ मि.मी. इतकी आहे. परंतु दि. १ ते १४ जून या कालावधीत आतापर्यंत केवळ १९.४७ मि.मी. म्हणजे १.९२ टक्के इतक्याच पावसाची नोंद झालेली आहे. गुरुवारी (दि.१३) जिल्ह्यातील सुरगाणा, येवला आणि इगतपुरी तालुक्यात थोड्या फार प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. मात्र, अपेक्षित अशी पावसाची हजेरी नसल्याने बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठाही वेगाने घटत चालला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा ५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच कालावधीत १३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. पावसाने येत्या दहा-पंधरा दिवसात समाधानकारक हजेरी न लावल्यास पाणीसंकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्यापही काही तालुक्यातून टॅँकरची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. पावसामुळे खरीपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण