विवाहितेच्या आत्महत्त्या प्रकरणी पाच जणांना कोठडी
By Admin | Updated: February 15, 2015 00:37 IST2015-02-15T00:32:05+5:302015-02-15T00:37:24+5:30
विवाहितेच्या आत्महत्त्या प्रकरणी पाच जणांना कोठडी

विवाहितेच्या आत्महत्त्या प्रकरणी पाच जणांना कोठडी
पिंपळगाव बसवंत : येथील विवाहितेने केलेल्या आत्महत्त्याप्रकरणी पाच जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली. सुनीता जाधव (१९) हिचे आठ महिन्यांपूर्वी पिंपळगाव बसंवत येथील कैलास राजगिरे यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सुनीतास सासरच्या लोकांकडून मानसिक त्रास देण्यात येत होता. नवीन घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा सासरच्या लोकांकडून होत होता. माहेरची परिस्थिती गरिबीची असल्याने पैसे आणणे अशक्य असल्याने शेवटी सुनीता हिने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. याप्रकरणी सुनीताची आई विमल जाधव यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कै लास राजगिरे(पती), प्रशांत राजगिरे (दीर), वैशाली प्रशांत राजगिरे (जाव), लक्ष्मीबाई राजगिरे (सासू), बळीराम राजगिरे (सासरा) यांना पिंपळगाव बसवंत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, गुन्हा दाखल करण्यात आला .