स्वाइन फ्लू कक्षात पाच रुग्ण
By Admin | Updated: April 5, 2015 00:26 IST2015-04-05T00:26:22+5:302015-04-05T00:26:51+5:30
स्वाइन फ्लू कक्षात पाच रुग्ण

स्वाइन फ्लू कक्षात पाच रुग्ण
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात पाच रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यामध्ये तीन महिला, दोन पुरुषांचा समावेश आहे़ कक्षातील तीनही महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ शुक्रवारी काल दहा महिन्यांच्या बाळाला स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मात्र, त्याचा मृत्यू स्वाइन फ्लूने नाहीतर न्युमोनियाने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे़ गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने या रुग्णांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे़ (प्रतिनिधी)