जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लू संशयित पाच रुग्ण दाखल
By Admin | Updated: August 17, 2015 01:18 IST2015-08-17T00:49:27+5:302015-08-17T01:18:36+5:30
जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लू संशयित पाच रुग्ण दाखल

जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लू संशयित पाच रुग्ण दाखल
नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून, जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे़ रविवारी आणखी एका रुग्णाची भर पडली असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाच झाली आहे़ दरम्यान, गत पंधरा दिवसांमध्ये चार रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़
जिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत पाच स्वाइन फ्लू संशयित उपचार घेत असून, त्यामध्ये दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ स्वाइन फ्लू वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्यांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे़ औरंगाबाद रोडवरील नांदूरनाका, निफाड तालुक्यातील चांदोरी, लासलगाव येथील महिला रुग्ण, तर सिन्नर व चाळीसगाव येथील पुरुष रुग्ण आहेत़ जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लू रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आहे़
जिल्हा रुग्णालयात औषधसाठा मुबलक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)