कनाशीतील पाच पांडव यात्रेची जय्यत तयारी

By Admin | Updated: February 14, 2016 23:19 IST2016-02-14T23:16:40+5:302016-02-14T23:19:24+5:30

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Five Pandav Yatra's Journey preparations in Kanashi | कनाशीतील पाच पांडव यात्रेची जय्यत तयारी

कनाशीतील पाच पांडव यात्रेची जय्यत तयारी

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथील पाच पांडव यात्रोत्सव दि. १९ ते २२ फेबुवारी दरम्यान होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कळवण-सापुतारा रस्त्यावरील कनाशी गावात पाच पांडव यांचे मंदिर आहे.
श्रीक्षेत्र काशी व्यतिरिक्त अन्य ठिकाणी दुर्मीळ असलेल्या पाच पांडवांचे एकमेव मंदिर केवळ कनाशी येथे पाहण्यास मिळते. यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारची रोगराई पसरू नये, म्हणून योग्य सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्या. ग्रामपंचायतीने यात्रेची जय्यत करत परिसरात मुरूम टाकणे, रस्ते दुरुस्ती, गावात विद्युत रोषणाई, साफसफाई, दिवाबत्ती आदि कामे केली आहेत. दि. १९ रोजी सकाळी ८ वाजता महापूजा व रथयात्रेची मिरवणूक काढण्यात येणार आहे, तर दि. २० रोजी महापूजा व महाआरती, दि. २१ रोजी रंगारंग लोकनाट्य तमाशा, दि. २२ रोजी दुपारी २ वाजेपासून मल्लांच्या उपस्थितीत कुस्तीचा फड रंगणार आहे. दरवर्षाप्रमाणे भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे . तसेच अवैध व्यवसाय यात्रा कालावधीत बंद करण्याची मागणी यात्रा कमिटीने केली आहे. याकामी यात्रा कमेटी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Five Pandav Yatra's Journey preparations in Kanashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.