जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह पाच जणांचे निलंबन आदेश प्राप्त
By Admin | Updated: April 14, 2015 00:57 IST2015-04-14T00:57:11+5:302015-04-14T00:57:37+5:30
दुकाने तपासण्याचे तहसीलदारांना आदेश

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह पाच जणांचे निलंबन आदेश प्राप्त
नाशिक : सुरगाणा येथील सुमारे ३० हजार क्विंटल धान्य घोटाळा प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ व प्रभारी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र सायंकर यांच्यासह तीन कर्मचारी अशा पाच जणांना अन्न व नागरी पुरवठा विभागाने निलंबित केले आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला सोमवारी प्राप्त झाले. दरम्यान, या धान्य घोटाळ्यात काहीही संबंध नसल्याची बाजू तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मांडली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पुरवठा खात्यातील अश्विनी खर्डे, लता चामकर व आर. एम. त्रिभुवन या तिघांचाही समावेश आहे. गेल्या गुरुवारी सुरगाणा येथील धान्य घोटाळा प्रकरणी जिल्'ातील नऊ तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह तेरा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली होती, त्यानंतर जिल्'ातील सर्व तहसीलदार व उपजिल्हाधिकारी तसेच राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत धाव घेऊन पुरवठामंत्री व महसूलमंत्र्यांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून दिली होती, तर शुक्रवारी या कारवाईच्या निषेधार्थ महसूल विभागाने कामकाजही बंद ठेवले होते. दरम्यान, मुंबईत झालेल्या बैठकीत पुरवठामंत्र्यांनी या साऱ्या घोटाळ्याची आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांकरवी चौकशी करून मगच निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने तहसीलदारांचे निलंबन टळले. त्यामुळे सोमवारी तहसीलदारांनी दैनंदिन कामकाजात भाग घेतानाच दुपारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन अन्न व नागरी पुरवठा विभागाने व पर्यायाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या कामकाजाबद्दल तक्रार केली