टिप्पर गँगच्या पाच सदस्यांना अटक

By Admin | Updated: June 27, 2015 01:57 IST2015-06-27T01:55:09+5:302015-06-27T01:57:27+5:30

टिप्पर गँगच्या पाच सदस्यांना अटक

Five members of Tipper Gang arrested | टिप्पर गँगच्या पाच सदस्यांना अटक

टिप्पर गँगच्या पाच सदस्यांना अटक

नाशिक : बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात दरोड्यासाठी जाणाऱ्या सिडकोतील गुन्हेगार समीर पठाण अर्थात टिप्पर गँगच्या पाच सदस्यांना ठाणे गुन्हे शाखेने गुरुवारी (दि़२५) अटक केली़ त्यांच्याकडून तीन पिस्तुल, काडतुसे, मोबाइल, कार व शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांनी दिली़ टिप्पर गँगमधील सराईत गुन्हेगार गणेश सुरेश वाघ (२५, रा़ पंचवटी), अनिल दादासाहेब बेंद्रे (३३), योगेश किरण शेवरे (३३, दोघे रा़ सातपूर) निखिल बाळू पगारे (२१), मुकेश दलपतसिंग राजपूत (२४, दोघे रा़ सिडको) हे कळवा येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात दरोडा टाकण्यासाठी जात होते.

Web Title: Five members of Tipper Gang arrested