नाशिककरांची पाच लाखांची मदत

By Admin | Updated: June 4, 2016 22:52 IST2016-06-04T22:44:31+5:302016-06-04T22:52:53+5:30

वनमहोत्सव : हरित नाशिकसाठी दानशुरांचा पुढाकार

Five lakhs of help for Nashikar | नाशिककरांची पाच लाखांची मदत

नाशिककरांची पाच लाखांची मदत

नाशिक : आपलं पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून नाशिककर रविवारी (दि.५) म्हसरूळ शिवारात पाच हजार रोपांची लागवड करत लोकसहभागातून वनमहोत्सव साजरा करणार आहे. लोकांनी लोकांसाठी हाती घेतलेल्या या उप्रकमासाठी शहरातील दानशुरांनी सुमारे पाच लाखांचा निधी संस्थेला उपलब्ध करून दिला आहे.
गेल्या वर्षी सातपूरच्या फाशीच्या डोंगरावर नाशिककरांनीही तब्बल ११ हजार रोपट्यांची लागवड करून वनमहोत्सव साजरा केला होता. याच पर्यावरणपूरक उपक्रमाचा दुसरा टप्पा आज पूर्ण होत आहे. म्हसरूळ शिवारातील वनविभागाच्या जागेत पाच हजार रोपे लावली जाणार आहे. या उपक्रमासाठी त्वचारोग तज्ज्ञांच्या संघटनेने ५० हजार, व्यावसायिक विलास पाटील, राजेंद्र वानखेडे यांनी ५१ हजार, गोल्डन ग्रुप वीस कार्यकर्त्यांनी आपापसांत वर्गणी काढून एक लाख रुपये रोख स्वरूपात दिले. तसेच मुख्य बाजार समिती मित्रमंडळातील वीस ते पंचवीस व्यापाऱ्यांनी वर्गणी काढून एक लाखाची मदत दिली. ए. एम. जागडे यांनी २१ हजार, संतोष व राजू भालेराव यांनी २५ हजार रुपयांची मदत दिली आहे. तसेच बहुसंख्य दानशूरांनी पाच ते दहा हजारांपर्यंतही अर्थसहाय्य केले आहे.

Web Title: Five lakhs of help for Nashikar