पाच लाख शिधापत्रिका- धारकांना तूरडाळ
By Admin | Updated: July 8, 2016 01:01 IST2016-07-08T00:44:18+5:302016-07-08T01:01:10+5:30
पाच लाख शिधापत्रिका- धारकांना तूरडाळ

पाच लाख शिधापत्रिका- धारकांना तूरडाळ
नाशिक : सणासुदीत गोरगरिबांना रेशनवर स्वस्त दरात तूरडाळ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे पाच लाख शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.
खुल्या बाजारात तूरडाळीचे भाव दोनशे रुपयांपर्यंत भिडल्याने येणाऱ्या सणासुदीच्या काळात गोरगरिबांना तूरडाळीशिवाय सण साजरा करावा लागणार असल्याचे पाहून दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीय तसेच अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना १२० रुपये दराने रेशन दुकानातून तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. आॅगस्ट महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असून, नाशिक जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे १,८०,७११ व दारिद्र्य रेषेखालील तीन लाख १९०९ शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात तूरडाळ मिळणार आहे. खुल्या बाजारातून तूरडाळ खरेदी करून ती रेशनवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने त्याच्या अंमलबजावणीस विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)