व्यावसायिकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:22 IST2020-12-05T04:22:29+5:302020-12-05T04:22:29+5:30

नाशिक : इंदिरानगर येथील एका व्यावसायिकास दमदाटी करीत दोन सराईत गुन्हेगारांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली ...

Five lakh ransom demand from the businessman | व्यावसायिकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी

व्यावसायिकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी

नाशिक : इंदिरानगर येथील एका व्यावसायिकास दमदाटी करीत दोन सराईत गुन्हेगारांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिकाला दमदाटी करून संशयित आकाश साबळे व त्याचा साथीदार हॅरी यांनी पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत घडली. याप्रकरणी राहुल पद‌्माकर चव्हाण (रा.गुंजाळ अव्हेन्यू, इंदिरानगर) यांनी दोन्ही खंडणीखोरांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. राहुल चव्हाण यांच्या श्रीमंगल गार्डन सोसायटीतील कार्यालयात गेल्या शनिवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास सराईत आकाश साबळे व हॅरी नामक साथीदाराने चव्हाण यांना गाठून खंडणीची मागणी केली. संशयितांशी कुठलाही आर्थिक व्यवहार नसताना त्यांनी तिसऱ्याच व्यक्तीचे देणे लागत असल्याचे धमकावून पाच लाख रुपये दे, नाहीतर एक गाडी दे अशी मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक उपनिरीक्षक एम.एस. जाधव करीत आहेत.

Web Title: Five lakh ransom demand from the businessman