भागिदारीच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक

By Admin | Updated: September 27, 2016 01:04 IST2016-09-27T01:04:24+5:302016-09-27T01:04:57+5:30

भागिदारीच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक

Five lakh cheating with the betrayal of the partner | भागिदारीच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक

भागिदारीच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक

नाशिक : महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत भागिदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून दोघा तोतया अधिकाऱ्यांनी एका महिलेची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साधना लक्ष्मणराव जाधव (४३, रा़ रुपाली हौसिंग सोसायटी, कॉलेजरोड) या महिलेस संशयित रवींद्र सुधाकर कुलकर्णी (रा़ कोळी गार्डन, खारघर, नवी मुंबई) व वृषाली खडतरे (रा़ पुणे) या दोघांनी आंतरराष्ट्रीय कंपनी सीटीसीआयमध्ये अधिकारी असल्याचे भासवले़ यानंतर कंपनीला महाराष्ट्रात भागिदारीत काम करायचे असल्याचे आमिष दाखवून जाधव यांच्याकडून ३० मे २०१६ ते १७ सप्टेंबर २०१६ या कालावधीत पाच लाख रुपये घेतले़
मात्र, हे दोघेही कंपनीत अधिकारी नसून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून या दोघांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: Five lakh cheating with the betrayal of the partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.