मृतांच्या वारसांना राज्याकडून पाच लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:53+5:302021-04-30T04:18:53+5:30

नाशिक : महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत कोविड कक्षातील २२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या ...

Five lakh assistance from the state to the heirs of the deceased | मृतांच्या वारसांना राज्याकडून पाच लाखांची मदत

मृतांच्या वारसांना राज्याकडून पाच लाखांची मदत

नाशिक : महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत कोविड कक्षातील २२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत मृत झालेल्या २२ रुग्णांपैकी १६ मृतांच्या वारसांना पाच लाख मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले असून यात अमरदीप नारायण नगराळे यांच्या पत्नी मंगला नगराळे, भारती बंडू निकम यांची मुलगी तेजस्विनी बंडू निकम, श्रावण रामदास पाटील यांची पत्नी मालूबाई पाटील, मोहन देवराम खैरनार यांचे पती देवराम गणपत खैरनार, सुनील भीमा झाल्टे यांची पत्नी सुवर्णा झाल्टे, सल्मा फकीर मोहम्मद शेख यांचा मुलगा इरफान फकीर मोहम्मद शेख, भय्या सांदूभाई सय्यद यांचा मुलगा साहिल सय्यद, प्रवीण पिरसिंग महाले यांची पत्नी जयश्री महाले, मंशी सुरेंद्र साह यांची पत्नी ममतादेवी, सुगंधाबाई भास्कर थोरात यांचा मुलगा विनोद थोरात, हरणबाई ताटेराव त्रिभुवन यांची मुलगी संगीता झाल्टे, रजनी रत्नाकर काळे यांचे पती रत्नाकर काळे, गीता रावसाहेब वाकचौरे यांचे पती रावसाहेब वाकचौरे, संदीप हरिश्चंद्र लोखंडे यांची पत्नी नीता संदीप लोखंडे, बुधा लक्ष्मण गोतरणे यांची मुलगी पुष्पा ज्ञानेश्वर माढे, वैशाली सुनील राऊत यांचा मुलगा कृष्णा राऊत यांना धनादेश अदा करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. तर उर्वरित पंढरीनाथ नेरकर, प्रमोद वालूकर, आशा शर्मा, बापूसाहेब घोटेकर, वत्सलाबाई सूर्यवंशी, नारायण गंगा इराक या सहा मृतांच्या वारसांना तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरच धनादेशाचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Five lakh assistance from the state to the heirs of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.