नाशिक जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST2021-09-26T04:17:04+5:302021-09-26T04:17:04+5:30

नाशिक : ॲपेरिक्षा आणि हायवा यांच्यामध्ये लासलगाव-विंचूर रोडवरील मंजुळा पॅलेससमोर शनिवारी (दि.२५) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ...

Five killed in road mishap in Nashik | नाशिक जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार

नाशिक जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार

नाशिक : ॲपेरिक्षा आणि हायवा यांच्यामध्ये लासलगाव-विंचूर रोडवरील मंजुळा पॅलेससमोर शनिवारी (दि.२५) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले. मृतात नगर जिल्ह्यातील लोणी (ता. राहाता) येथील दोघांचा समावेश असून ते लासलगावी अंत्यविधीसाठी आले होते.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लासलगावहून विंचूरच्या दिशेने निघालेली ॲपेरिक्षा (क्रमांक एमएच १५, वाय ४४६१) मध्ये रिक्षाचालकासह पाच जण प्रवास करत होते. त्याच सुमारास विंचूरहून लासलगावच्या दिशेने निघालेल्या हायवाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रिक्षाचालक सुहास मनोहर निकाळे (४०, विंचूर), विठ्ठल बाजीराव भापकर (६५, लोणी प्रवरा), भाऊसाहेब बाळासाहेब नागरे (६०, लोणी प्रवरा), किसनदास बैरागी (६०, धारणगाव खडक), रतन पवार (४०, इंदिरा नगर, विंचूर) यांचा समावेश आहे. अपघाताचे वृत्त समजताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल वाघ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त पाचही जणांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित घोंगडे यांनी तपासणी केली असता चार जण मृतावस्थेत आढळून आले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे सदस्य डॉ. सुजित गुंजाळ आणि डॉ. विलास कांगणे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन उपचारासाठी मदत केली.

-----------------------

अंत्यविधी बेतला जीवावर

अपघातातील दोघे विठ्ठल बाजीराव भापकर व भाऊसाहेब बाळासाहेब नागरे हे दोन प्रवासी लोणी प्रवरा येथून लासलगावजवळील पिंपळगावनजीक येथे भाऊसाहेब पठारे यांच्याकडे अंत्यविधीसाठी सकाळी आले होते. अंत्यविधी कार्यक्रम आटोपून आपल्या गावी जाण्यासाठी ते विंचूरला रिक्षाने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. (२५ लासलगाव ॲक्सिडेंट १/२/३)

250921\25nsk_46_25092021_13.jpg~250921\25nsk_47_25092021_13.jpg~250921\25nsk_48_25092021_13.jpg

२५ लासलगाव ॲक्सीडेंट १~२५ लासलगाव ॲख्सीडेंट २~२५ लासलगाव ॲख्सीडेंट ३

Web Title: Five killed in road mishap in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.