नाशिकजवळ कारच्या अपघातात ५ ठार

By Admin | Updated: December 19, 2015 10:17 IST2015-12-19T10:00:03+5:302015-12-19T10:17:39+5:30

नाशिक जिल्ह्यातील वणीजवळ एक भरधाव वेगाने जाणारी कार झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात ५ ठार ३ जण जखमी झाले

Five killed in a car accident near Nashik | नाशिकजवळ कारच्या अपघातात ५ ठार

नाशिकजवळ कारच्या अपघातात ५ ठार

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. १९ - नाशिक जिल्ह्यातील वणीजवळ एक भरधाव वेगाने जाणारी कार झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले असून तिघे गंभीर जखमी झाले आहे. शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास कळवणी-वणी रस्त्यावर खांडे मळ्याजवळ हा अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, मित्राचा वाढदिवस साजरा करून येते असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ती झाडाला जाऊन धडकली. मात्र हा अपघाता एवढा भीषण होता कार पूर्णपणे चक्काचूर झाली असून पाच जण जागीच ठार झाले. मृत नागरिक वणी गावचे रहिवासी असून गावावर शोककळा पसरली आहे. 

दरम्यान जखमींवर वणीतील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
 

Web Title: Five killed in a car accident near Nashik