मुंबर्ई आग्रामहामार्गावर पिंपळगाव जवळ अपघातात पाच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 14:21 IST2019-02-24T14:19:48+5:302019-02-24T14:21:06+5:30
नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव जवळ शिरवाडे फाट्याच्या अलिकडे दोन आयशर मध्ये समोरासमोर टक्कर होऊन पाच जण दगावल्याची माहिती ...

रस्त्यावर समोरून येणाºया दोन्ही आयशरमध्ये अपघात झाला.
नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव जवळ शिरवाडे फाट्याच्या अलिकडे दोन आयशर मध्ये समोरासमोर टक्कर होऊन पाच जण दगावल्याची माहिती मिळाली आहे.
मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरूष व एका सहा महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
नाशिक येथील टाकळी येथील कांडेकर कुटूंबियातील एका बाळाचे जावळ काढण्याच्या कार्यक्रमासाठी काही भाविक चांदवड तालुक्यातील केदराई येथे आयशरने जात होते.
रविवार दि.२४ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या आयशरला समोरून येणाऱ्या दुसºया आयशरने धडक दिली. नाशिकहून केदराईकडे जात असलेल्या आयशरला ‘रॉँग साईड’ने येणाºया एका वाहनाने हुलकावणी दिली. यांत हा आयशर रस्त्याच्या विरूध्द बाजुला गेला. या रस्त्यावर समोरून येणाºया दोन्ही आयशरमध्ये अपघात झाला.