पदव्युत्तर वैद्यकीयच्या पाचशे जागा राज्यासाठीच

By Admin | Updated: May 13, 2017 00:42 IST2017-05-13T00:41:46+5:302017-05-13T00:42:08+5:30

नाशिक : पदव्युत्तर आणि दंत वैद्यकीय शिक्षणक्रमांसाठी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पाचशे जागांवर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे,

Five hundred seats for post-graduate degrees | पदव्युत्तर वैद्यकीयच्या पाचशे जागा राज्यासाठीच

पदव्युत्तर वैद्यकीयच्या पाचशे जागा राज्यासाठीच

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पुढील वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणक्रमांसाठी राज्यातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पाचशे जागांवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाने खासगी आणि अभिमत संस्थांमध्ये राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ६७.५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या विरोधात काही पालकांनी सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे न्यायालयाने राज्य शासनाच्या निर्णयाला स्थगिती देत प्रवेश प्रक्रिया सुरू असताना अशाप्रकारचा निर्णय घेता येणार नाही असे नमूद केले होते. त्यामुळे राज्य शासनाची अडचण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता राज्य शासन पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय उच्च शिक्षणाची संधी कशी मिळेल या दृष्टीने राज्य शासन रणनीती ठरवित असल्याची माहिती महाजन यांनी दिली. गेल्यावेळी हे शक्य झाले नसले तरी पुढील वर्षी कायदा करूनच महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना न्याय देऊ, परप्रांतीय विद्यार्थ्यांना प्रवेशच दिला जाणार नसल्याने सुमारे पाचशे जागा राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाटेला येतील, असे ते म्हणाले.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. राज्य शासनाचीदेखील हीच भूमिका होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यापूर्वी निर्णय घेतला होता. परंतु त्यात अडचणी निर्माण झाल्याने पुढील वर्षापासून कायदेशीररीत्या मार्ग काढला जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

Web Title: Five hundred seats for post-graduate degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.