पाचशे मुलींना मिळणार सायकली
By Admin | Updated: July 26, 2014 00:50 IST2014-07-26T00:35:51+5:302014-07-26T00:50:22+5:30
पाचशे मुलींना मिळणार सायकली

पाचशे मुलींना मिळणार सायकली
नाशिक : दूरवरील अंतरावरून शिक्षणासाठी महापालिकेच्या माध्यमिक शाळेत येणाऱ्या पाचशे विद्यार्थिनींना सायकली देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाचशे सायकली देण्यात येणार असून, स्वातंत्र्य दिनाच्या आत मुलींना त्या वितरित केल्या जाणार आहेत. महापालिकेच्या एकूण ११ माध्यमिक शाळा आहेत. त्यात सुमारे तीन हजार मुली शिक्षण घेतात. अनेक मुलींना दूरवरून शिक्षण घेण्यासाठी यावे लागते. त्यापैकी सुमारे तीन किलोमीटरपेक्षा अधिक लांब अंतरावरून येणाऱ्या मुलींचा विचार करून पालिकेने या मुलींना सायकली देण्याचा निर्णय घेतला. सायकल खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या १५ आॅगस्टच्या आत या मुलींना सायकली देण्यात येणार आहे.