शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पाचशे कोटींचा घोटाळा, थेट ‘ईडी’कडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 16:18 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती हे माजी खासदार पिंगळे यांचे वर्षानुवर्षे सत्तास्थान असून मध्यंतरी शिवसेनेत असलेले शिवाजी चुंभळे यांनी ...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती हे माजी खासदार पिंगळे यांचे वर्षानुवर्षे सत्तास्थान असून मध्यंतरी शिवसेनेत असलेले शिवाजी चुंभळे यांनी त्यांच्या सत्तेला सुरूंग लावला होता. मात्र आता पुन्हा पिंगळे यांच्याच ताब्यात ही समिती आहे. त्यांच्या आणखी एका सत्ता स्थानाला म्हणजेच गोदावरी कृषक संस्थेला आव्हान देण्याचे काम भाजपाचे ज्येेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले, मात्र त्यात यश आले नाही. त्यातच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरकारभाराच्या विरोधात लढणारे सध्या भाजपचे शहर सरचिटणीस असलेले सुनील केदार यांनी एकत्र येऊन बुधवारी बाजार समितीतील घोटाळ्याची तक्रार ईडीकडे केली. महाविकास आघाडी सरकारच्या ताब्यातील यंत्रणा निष्पक्षपणे चौकशी करतील अशी खात्री नसल्यानेच ही तक्रार थेट ईडीकडे करण्यात आल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१३-१४ या वर्षातील लेखापरीक्षणात घेण्यात आलेल्या आक्षेपातून सुमारे पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे, असा दावा दिनकर पाटील आणि सुनील केदार यांनी केला आहे. लेखापरीक्षणासह अन्य कागदपत्रेही पुरावा म्हणून त्यांनी ईडीला सादर केली आहेत. गेली २० वर्षे पिंगळे यांच्याकडे सत्ता असून त्यामुळेच घेाटाळ्याचा एकंदर हिशेब बघितला तर अब्जावधी रुपयांचा घोटाळा आहे, असेही त्यात नमूद असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि शेतकरी तसेच बाजार समितीच्या नुकसानीस कारणीभूत असणाऱ्या संबंधितांच्या विरोधात कारवाई करावी, असेही तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक