कराटे स्पर्धेत पाच विद्यार्थिनींना सुवर्णपदक

By Admin | Updated: September 20, 2014 00:37 IST2014-09-19T23:36:31+5:302014-09-20T00:37:34+5:30

कराटे स्पर्धेत पाच विद्यार्थिनींना सुवर्णपदक

Five girls were awarded gold medal in the karate tournament | कराटे स्पर्धेत पाच विद्यार्थिनींना सुवर्णपदक

कराटे स्पर्धेत पाच विद्यार्थिनींना सुवर्णपदक

ओझरटाऊनशिप : नाशिक येथे झालेल्या १८व्या आंतरशालेय
कराटे स्पर्धेतील अंतिम सामन्यात एचएएल हायस्कूलच्या पाच विद्यार्थिनींनी सुवर्णपदक, तर तीन विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकावून
यश संपादन केले. स्पर्धेचे आयोजन शितो रियू कराटे क्लब मार्शल नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले होते.
विविध वयोगटानुसार घेण्यात आलेल्या स्पर्धेत एचएएल हायस्कूलच्या दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या दहा विद्यार्थ्यांमधील कश्वीन शेख, सानिया पाटील, अनुष्का सोनवणे, स्नेहल उबाळे, हर्षदा उबाळे यांनी सुवर्णपदक पटकावले. खुशी ढाके, हर्षल जाधव, अथर्व पेऊराज यांनी रौप्यपदक पटकावले. विद्यार्थ्यांना एस. के. शर्मा, नितीन वाघ व भारत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)
मरेमा विद्यालयाचे
बॅडमिंटन स्पर्धेत यश
मनमाड : नाशिक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत येथील मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला.
विद्यालयातील सोमेश्वर इंगोले, अंकित शर्मा या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सुनंदा पैठणकर, सरिता तनपुरे, पाटील, कुंझरकर, क्रीडाशिक्षक व्ही. आर. कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)

Web Title: Five girls were awarded gold medal in the karate tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.