मालेगावी पाच विद्यार्थिनींना विषबाधा
By Admin | Updated: August 27, 2015 23:56 IST2015-08-27T23:54:45+5:302015-08-27T23:56:02+5:30
मालेगावी पाच विद्यार्थिनींना विषबाधा

मालेगावी पाच विद्यार्थिनींना विषबाधा
आझादनगर : मालेगाव शहरातील मनपा शाळा क्र. ८० येथील तीन विद्यार्थिनींसह दोन मैत्रिणींना शाळेच्या माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली. त्यांना त्रास होऊ लागल्याने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पाचही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून, त्यांना लवकर घरी सोडण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मित नोंद करण्यात आली आहे.
शहरातील अग्निशामक केंद्राच्या पाठीमागील शाळा क्रमांक ८० येथे नित्याप्रमाणे माध्यान्ह भोजन दिले जाते. जेवणात तांदूळ व मटरची घुघरी तयार करण्यात आली होती. शाळा क्रमांक ८० येथील विद्यार्थिनी यास्मीन मो. आबीद (११), आमना अब्दुल गफ्फार (१२), शहेरबानो शेख मुसा यांच्यासह त्यांच्याच गल्लीतील व याच शाळेच्या इमारतीमधील दोन विद्यार्थिनी नाजमीनबानो गफ्फार खान (१०) व समरीन कलीम अहमद (११) रा.कमालपुरा पाचही विद्यार्थिनींनी जेवण केल्याने त्यांना त्रास होऊ लागला. परंतु घरी वडील कामावर गेले असल्याने त्यांना दुपारनंतर सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात
आले. सायंकाळपर्यंत त्यांची
प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले. (वार्ताहर)