कोरोनाच्या धसक्याने विमा घेण्याच्या प्रमाणात पाच पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:00 PM2020-10-06T23:00:40+5:302020-10-07T01:10:43+5:30

नाशिक : मार्च महिन्यापासून सातत्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सवर्सामान्य नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. या भीतीवर तोडगा म्हणून अनेक नागरिकांनी आपला मेडिक्लेम तसेच आयुविर्मा वाढवून घेतले आहेत. किंवा ज्यांच्याकडे यापूर्वी हे दोन्ही विमा नव्हते, त्यांनी नवीन विमा मिळवत स्वत:साठी सुरक्षेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोरोना वाढीच्या प्रमाणात चौपट ते पाच पटीने वाढ झाली आहे.

Five-fold increase in insurance coverage due to corona shock | कोरोनाच्या धसक्याने विमा घेण्याच्या प्रमाणात पाच पट वाढ

कोरोनाच्या धसक्याने विमा घेण्याच्या प्रमाणात पाच पट वाढ

Next
ठळक मुद्दे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा विमा काढता येऊ शकतो.

नाशिक : मार्च महिन्यापासून सातत्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सवर्सामान्य नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. या भीतीवर तोडगा म्हणून अनेक नागरिकांनी आपला मेडिक्लेम तसेच आयुविर्मा वाढवून घेतले आहेत. किंवा ज्यांच्याकडे यापूर्वी हे दोन्ही विमा नव्हते, त्यांनी नवीन विमा मिळवत स्वत:साठी सुरक्षेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोरोना वाढीच्या प्रमाणात चौपट ते पाच पटीने वाढ झाली आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर अचानक संकट नको म्हणून नागरिकांनी त्यांच्या परीने काहीशा कमी खर्चाचा विमा काढण्याला प्राधान्य दिले आहे. कोरोनाच्या निमित्ताने विमा काढण्याबाबत नागरिक अधिक सजग झाले असल्याचा कल आयुविर्मा महामंडळ युनायटेड इन्शुरन्स आणि अन्य सर्व खाजगी कंपन्यांमध्ये देखील दिसून येत आहे. वर्षाच्या प्रारंभापासून जगभरात कोरोनाच्या किरकोळ बातम्या येत असल्या तरी नाशिकला साधारणपणे मार्च महिन्यापासून त्याबाबत अधिक प्रमाणात चर्चेला जोर आला होता. मार्च अखेर आणि एप्रिलमध्ये काही नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मात्र हा वेग मोठ्या प्रमाणात वाढला. मेपर्यंत कोरोनाचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच ऐन पावसाळ्यात धोरणाने धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला. त्यामुळे मी महिन्याच्या अखेरीस तसेच त्यानंतरच्या तीन महिन्यात कोरोनापासून सुरक्षितता मिळवण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या उपाययोजनांना नागरिकांनी प्राथमिकता दिली. त्यात स्वच्छता, मास्क आणि आहारात केलेल्या बदलाबरोबरच आवश्यकता भासल्यास कमी पडू नये म्हणून मेडिक्लेमचा देखील अवलंब केला. ज्यांच्याकडे कोणत्या कंपनीचा मेडिक्लेम नव्हता त्यांनी त्यातल्या त्यात कमी दराचे असणारे कंपन्यांचे मेडिक्लेम स्वीकारण्याचा पवित्रा घेतला. तर समजा काही बरेवाईट झाले तर निदान आपल्या कुटुंबाला त्याचा फटका बसू नये, या उद्देशाने अनेक नागरिकांनी आयुविर्मादेखील काढण्याला प्राधान्य दिले. ज्यांच्याकडे हे दोन्ही विमा होते , त्यांनी त्याच्या रकमेत वाढ करण्याचा किंवा नवीन अजून एक विमा स्वीकारत आपल्या भविष्यातील सुरक्षिततेचा मार्ग अवलंबला. त्यासाठी अनेक नागरिकांनी कोविड विम्याचा पर्याय स्वीकारत खबरदारी घेतली. कोविडचा विमा हा नऊ महिन्यांसाठी असल्याने त्याचा दर काहीसा कमी आहे. सर्व आजार कव्हर करणा?्या अन्य पॉलिसीतही या आजारावर उपचार शक्य आहेत. मात्र नागरिक कोरोनाच्या प्रभावामुळे आधीच भयभीत झालेले आहेत, त्यामुळे कोरोना विमा घेण्याला त्यांच्याकडून प्राधान्य दिले जात आहे. या विम्याचा मंजुरीचा कालावधी पंधरा दिवसांचा आहे. तसेच कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा विमा काढता येऊ शकतो. नाशिक शहरात तसेच जिल्ह्यात या आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण पाच पटीने तर आयुविर्मा काढण्याच्या प्रमाणात तिप्पटीने वाढ झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 

Web Title: Five-fold increase in insurance coverage due to corona shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.