पाच दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:27 IST2017-08-13T00:25:45+5:302017-08-13T00:27:44+5:30

नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी बुलेटसह पाच दुचाकी चोरून नेल्याची घटना घडल्या आहेत़ या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे़

Five bikes stolen | पाच दुचाकींची चोरी

पाच दुचाकींची चोरी

नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी बुलेटसह पाच दुचाकी चोरून नेल्याची घटना घडल्या आहेत़ या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे़
श्रमिकनगरमधील शैलेश शिरसाठ यांची ४० हजार रुपये किमतीची बुलेट (एमएच १५ इओ ४२६१) चोरट्यांनी पार्किंगमधून चोरून नेली़ इंदिरानगरमधील जलपरी सोसायटीतील रहिवासी वर्षा पाटील यांची ४० हजार रुपये किमतीची मेस्टो दुचाकी (एमएच १५ डीवाय ७४४७) आरवायके महाविद्यालयात पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली़ विहितगाव येथील रोहित कोठुळे यांची ४० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच १५ ईझेड ५८४१) दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारातून चोरट्यांनी चोरून नेली़ मेरी परिसरातील जावेद तडवी यांची ३५ हजार रुपये किमतीची डिओ दुचाकी (एमएच १५ एफडी ३४८३) चोरट्यांनी पोलीस चौकीपाठीमागून चोरून नेली़ सिडकोतील बुरकुले हॉल परिसरातील संदीप यांची २० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच ३९ टी ३३४०) चोरट्यांनी अंबड औद्योगिक वसाहतीतील लेअर अ‍ॅटो कंपनीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली.

Web Title: Five bikes stolen