शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून दीड लाखांच्या पाच दुचाकी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 20:47 IST

गोदाघाट परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रीय असल्याच्या तक्रारी येत आहेत. या भागातून सातत्याने दुचाकी लांबविल्या जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देदुचाकी चोरांचा पुन्हा शहरात हैदोस सातत्याने दुचाकी लांबविल्या जात असल्याने तीव्र नाराजी

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकीचोरांनी नागरिकांच्या घराजवळून दुचाकी चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. जुने नाशिक, गोदाघाट, दत्तमंदीर, जयभवानीरोड या भागातून चोरट्यांनी वेगवेगळ्या दुचाकी गायब केल्याचे उघडकीस आले आहे. गोदाघाट परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रीय असल्याच्या तक्रारी येत आहेत. या भागातून सातत्याने दुचाकी लांबविल्या जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.दुचाकी चोरांनी पुन्हा शहरात हैदोस घालण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांकडून सातत्याने दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या जात असल्या तरी दुचाकी चोरीचे गुन्हे थांबता थांबत नसल्याने पोलिस प्रशासनही चक्रावले आहे. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावरून विजय चिंधा पवार (५९, रा.अशोकनगर) यांनी त्यांची स्पलेंडर दुचाकी (एम.एच.१५ बीबी ५८१९) उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने दुचाकीचे हॅन्डल लॉक तोडून चोरट्यांनी दुचाकी पळविली. दोन दिवसांपुर्वी याच परिसरातून अतुल मोकाशी यांच्या मालकीची लाल रंगाची बजाज प्लॅटिना दुचाकी (एम.एच १५ टीई ६४२७)चोरट्यांनी अशाच पध्दतीने लंपास केली.दुसऱ्या घटनेत भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागवानपुरा भागातील रहिवाशी अबुतआला खलिफा (१९) या युवकाने त्याच्या घराजवळ उभी केलेली अ‍ॅक्टिवा (एम.एच.१५ एचबी १४९६) अज्ञात चोरट्याने लंपास केली. खलिफा यांच्या फिर्यादीवरून ५९ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीसºया घटनेत उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्नेहबंधन कॉलनी, दत्तमंदीर येथे राहणारे राहूल चंद्रकांत म्हसे यांची अ‍ॅक्टिवा दुचाकी (एम.एच१५ जीक्यू ४७३७) अज्ञात चोरट्यांनी गायब केली. त्यांच्या फिर्यादीवरून ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरीचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे. चौथ्या घटनेत नाशिकरोड पोलिसांच्या हद्दीतून राहुल राजकुमार गोते (२६,रा.विद्याविहार सोसा.जयभवानीरोड) यांच्या मालकीची बजाज डिस्कव्हर दुचाकी (एम.एच.१५ ईआर ५३५८) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनांमध्ये सुमारे सुमारे दीड लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी वाहनांच्या स्वरूपात लुटल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयbikeबाईकtheftचोरी