शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

सुकेणे रस्त्यावर सात दिवसांत पाच अपघात

By admin | Updated: July 10, 2014 01:06 IST

सुकेणे रस्त्यावर सात दिवसांत पाच अपघात

कसबे सुकेणे : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेजबाबदार कारभारामुळे ओझर ते सुकेणे या प्रमुख जिल्हा मार्गावरील अपघाती वळणांवर एकाच आठवड्यात तब्बल पाच अपघात झाले आहेत. यामुळे सुकेणे परिसरात संताप व्यक्त होत असून, या वळणांवरील अर्धवट असलेली कामे पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाव्दारे केली आहे.ओझर ते सुकेणे रस्त्यावरील वाहतुकीत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ओझर व दिंडोरी भागातून जाणारी सर्व प्रकारची अवजड व प्रवाशी वाहने येवला, औरंगाबादकडे याच मार्गाने जातात. तसेच निफाड, कसबे सुकेणे, ओझर अशी तीन मोठी बाजारपेठांची गावे याशिवाय पिंपळस रामाचे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, दीक्षी, शिलेदारवाडी ही गावेही परस्परांना जोडली जात असल्याने या रस्त्यावरील वाहतुकीत झपाट्याने वाढ झाली आहे. या रस्त्याचे रुंदीकरण सोळा वर्षांपूर्वी स्व. आमदार रावसाहेब कदम यांच्या कार्यकाळात झाले होते. वाहनांची संख्या पाहता हा रस्ता सुरक्षित होता. परंतु अलीकडच्या सात ते आठ वर्षांपासून या मार्गावरील वाहतुकीत प्रचंड वाढ झाली असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. जनार्दन पर्णकुटीजवळ रस्त्याच्या वळणावर बाणगंगा नदीपात्राच्या बाजूने संरक्षण भिंत बांधण्यात आली, मात्र रेलिंग व रेडिअम व कलर पट्ट्यांचे काम ठेकेदार अर्धवट सोडून गेल्याने हे काम तसेच रेंगाळले असून, सुमारे एक कोटी रुपये खर्च करून केलेले डांबरीकरण निकृष्ट झाले असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, भीमराव बोराडे, कसबे सुकेणे येथील बबन शेवकर यांनी निवेदनाव्दारे कळविले आहे. थेरगाव गावाजवळ असलेल्या नाल्याच्या मोरीची दोन्हीही बाजूने पडझड झाली आहे. याबाबतही बऱ्याचवेळा निवेदने दिली तरीही दखल घेतली जात नसल्याचे प्रवीण जाधव यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात झालेल्या पाच अपघातातही गंभीर इजा पोहोचल्याने एकास जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत तातडीने उपाययोजना करून अपघाती वळणांवर, गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारून फलक लावावेत. वाहतुकीत अडसर असलेली झाडेझुडपे काढावीत तसेच थेरगाव मोरीची दुरुस्ती करावी, मौलाना बाबा दर्गा, दात्याणे-दीक्षी या टप्प्यातील खड्डे बुजवावेत, जनार्दन पर्णकुटीजवळील रस्ता संरक्षण रेलिंगचे काम पूर्ण करून रेडिअम व पांढरे पट्टे मारण्याची मागणी करण्यात आली आहे. दखल न घेतल्यास आंदोलनचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.(वार्ताहर)सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष असून, हा रस्ता मृत्यूचा साफळा बनला आहे. संबंधितांनी दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. - अर्जुन बोराडे जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना थेरगाव मोरी अतिशय धोकेदायक झाली आहे. संबंधितांना अनेक वेळा सांगूनही दखल घेतली जात नाही. - प्रवीण जाधव, कसबे सुकेणे