मासेमाऱ्यांनी काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:06 IST2020-04-14T22:48:35+5:302020-04-15T00:06:11+5:30

मालेगाव येथे वाढत जाणारी कोरोना-बाधित रुग्णांची संख्या ही सुरगाणा तालुक्याचीही चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे येथील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. संचारबंदी असतानाही बंधाºयात मासेमारी करणाºया आणि सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासणाºया युवकांना पोलिसांनी दणका दिला आणि त्यांनी पकडलेले मासे पुन्हा बंधाºयात ओतून दिले.

The fishermen made the escape | मासेमाऱ्यांनी काढला पळ

मास्तेमानी येथील बंधाऱ्यात मासे पुन्हा सोडून देताना पोलीस.

ठळक मुद्देपोलिसांचा दणका : सोशल डिस्टन्सिंगला हरताळ

अलंगुण : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे वाढत जाणारी कोरोना-बाधित रुग्णांची संख्या ही सुरगाणा तालुक्याचीही चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे येथील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. संचारबंदी असतानाही बंधाºयात मासेमारी करणाºया आणि सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासणाºया युवकांना पोलिसांनी दणका दिला आणि त्यांनी पकडलेले मासे पुन्हा बंधाºयात ओतून दिले. पोलिसांच्या या कारवाईने मासेमारी करणाºयांनी मात्र तेथून पळ काढला. बाºहे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारे सर्कल पाडा, गुरटेंभी, गोपाळपूर, घनखी, गडगा, आळीदांड, मास्तेमानी, दाबाडमाळ, हस्ते, हट्टीपाडा आदी गावात खबरदारीचे सर्व उपाय पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लोखंडे राबवत असतानाही परिसरातील मास्तेमानी या ठिकाणच्या बंधाºयात सोशल डिस्टनला हरताळ फासत मासेमारी करण्यासाठी बरेच लोक एकत्र आले होते. सदरची घटना पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लोखंडे यांना समजताच आपल्या निवडक पथकाला सोबत घेऊन त्यांनी तातडीने मास्तेमानी येथील बंधाºयाकडे धाव घेतली. यावेळी पोलीस आपल्याकडे येत असल्याचे पाहून मासेमारी करणाºयांनी बंधाºयातून काढता पाय घेत पळ काढला.
कारवाईत पकडलेले मासे पुन्हा बंधाºयात सोडण्यात आले. या कारवाईत पोलीस हवालदार बारागळ, कॉन्स्टेबल मोरे, खुरकुटे आदी सहभागी झाले होते. दरम्यान, नागरिकांना नियम पालन करण्याचे आवाहन राजेंद्र लोखंडे यांनी केले आहे.

Web Title: The fishermen made the escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.