अंगुलगाव तलावात सोडले मत्सबीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:20+5:302021-09-02T04:29:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क येवला : तालुक्यातील अंगुलगाव येथील अहिल्याबाई होळकर पाझर तलावात १० हजार मत्स्यबीज पंचायत समिती सभापती प्रवीण ...

अंगुलगाव तलावात सोडले मत्सबीज
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यातील अंगुलगाव येथील अहिल्याबाई होळकर पाझर तलावात १० हजार मत्स्यबीज पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, उद्योजक मच्छींद्र पवार यांच्या हस्ते सोडण्यात आले.
हैदराबाद येथून सदर मत्स्यबीज आणण्यात आले होते.
आदिवासी बांधवांना गावातच रोजगार मिळावा, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतर होऊ नये यासाठी सभापती गायकवाड यांच्या कल्पनेतून गेल्या नऊ वर्षांपासून तालुक्यातील १४ पाझर तलावांमध्ये मत्स्यबीज टाकण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमातून आदिवासी बांधवांना स्थानिक स्तरावर मत्स्य उत्पादनाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. तर आदिवासींचे स्थलांतर थांबल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षणदेखील सुरळीत सुरू राहिले आहे.
कार्यक्रमास सरपंच बाजीराव जाधव, अंकुश शिरसाट, अविनाश जगताप, सोपान जगताप, परमानंद जाधव, पुंजाराम गायकवाड, शिवाजी गायकवाड, पोलीस पाटील समाधान झाल्टे, पंकज जाधव, विजय मोरे, रमेश सोनवणे, खरवंडीचे सरपंच जगन मोरे आदीसंह ग्रामस्थ उपस्थित होते.
(३० येवला २)
300821\221430nsk_41_30082021_13.jpg
अंगुलगाव तलावात सोडले मत्सबीज.