शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच नाशकात ; वकील परिषदेचे करणार उद्घाटन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 20:07 IST

नाशिक शहरात शनिवारपासून (दि. १५) दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून, या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत.

ठळक मुद्देनाशिकमध्ये वकीलांची राज्यस्तरीय परिषदजिल्हा न्यायालयाच्या आवारात जय्यत तयारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी उद्घाटन

नाशिक : शहरात शनिवारपासून (दि. १५) दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून, या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. १६) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती बार कौन्सिल ऑफ  महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी शुक्रवारी (दि.१४ ) पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशन आणि नाशिक वकील संघातर्फे  आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेचे जिल्हा आवारात शनिवारी (दि.१५) सायंकाळी ५.५५ वाजता सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यासह देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल अशुतोष कुंभकोणी व गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनलर देवीदास पंगम यांचीही प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. उपस्थित मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर ७ वाजून २५ मिनिटांनी सरन्यायाधीश शरद बोबडे उपस्थितांना उद््घाटनपर भाषणातून मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या आवारात रात्री १० वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या दुसºया दिवशी रविवारी (दि.१६) सकाळी १० वाजता भूषण गवई यांच्या अध्यक्षतेत प्रथम सत्रास प्रारंभ होणार आहे. यात  ‘मार्चिंग टूवार्डस स्पीडी मॉडर्न ज्युडिशिअरी’ विषयावर भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ए.एन.ए. नंदकर्णी, महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल अशुतोष कुंभकोणी, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. शेखर नेफाडे व देशाचे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजेंद्र रघुवंशी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या सत्रात २ ते ३.३० वाजेदरम्यान, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे मननकुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेत राज्यभरातील २६ ज्येष्ठ वकिलांचा सत्कार करण्यात येणार असून, या दोनदिवसीय वकील परिषदेचा समारोप माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहनमंत्री अनिल परब, महापौर सतीश कुलकर्णी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे नाशिक बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिकadvocateवकिलSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय