पाण्याविना पहिला गुरुवार‘
By Admin | Updated: March 10, 2016 23:40 IST2016-03-10T23:39:07+5:302016-03-10T23:40:10+5:30
ड्राय डे’मुळे गैरसोय : आज कमी दाबाने पाणीपुरवठा

पाण्याविना पहिला गुरुवार‘
नाशिक : गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी महापालिकेने आठवड्यातून संपूर्ण एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारी केली. महापालिकेने पाणीकपातीची पूर्वसूचना अगोदरच देऊन ठेवल्याने नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवला; परंतु प्रामुख्याने झोपडपट्टी भागासह सिडको, सातपूर परिसरातून आलेल्या मागणीनुसार मनसेमार्फत मोफत पाणीपुरवठा करण्यात आला. गुरुवारच्या ‘ड्राय डे’मुळे शुक्रवारी पाण्याची मागणी वाढणार असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग फसल्यानंतर एक संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी गुरुवारचा दिवस निवडला.