नाशिकरोडच्या ‘माया’ला प्रथम पारितोषिक
By Admin | Updated: April 1, 2017 00:55 IST2017-04-01T00:54:51+5:302017-04-01T00:55:03+5:30
नाशिकरोड : मारवाड जातीच्या घोड्यांच्या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये नाशिकरोड येथील राहुल बोराडे यांच्या माया नामक घोडीला ‘टू टीथफिली’ या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

नाशिकरोडच्या ‘माया’ला प्रथम पारितोषिक
नाशिकरोड : इंडिजिनिअस हॉर्स ओनर्स असोसिएशनच्या वतीने सोमाटणे येथे जोपिलोपी स्टड फार्म येथे आयोजित मारवाड जातीच्या घोड्यांच्या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये नाशिकरोड येथील राहुल बोराडे यांच्या माया नामक घोडीला ‘टू टीथफिली’ या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पुण्याजवळील तळेगाव येथील सोमाटणे येथे इंडिजिनिअस हॉर्स ओनर्स असोसिएशनच्या वतीने नुकतेच तीनदिवसीय मारवाड जातीच्या घोड्यांचे प्रदर्शन व स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाचे संस्थापक सदस्य जसपालसिंह रावल यांच्या हस्ते झाले. मारवाडच्या भूमितील मूळ प्रजातीचे लोप पावलेले वैभव अश्वांना पुन्हा प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या मारवाड जातीच्या घोड्यांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हिमाचल, आसाम, उत्तर प्रदेश आदिंसह इतर राज्यांतील अश्वमालक आपल्या अश्वांसह सहभागी झाले होते. विविध प्रकारांत व गटात भरविण्यात आलेल्या या स्पर्धेतील ‘टू टीथफिली’ या गटात नाशिकरोड येथील आरटीबी स्टड फार्मचे राहुल तुकाराम बोराडे यांच्या मारवाड जातीच्या माया नामक घोडीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. इंडिजिनिअस हॉर्स ओनर्स असोसिएशनचे सचिव अजय नेन्सी यांच्या हस्ते मायाचे मालक राहुल बोराडे यांना प्रथम क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. (प्रतिनिधी)
क्रीडाक्षेत्र, नवी पिढी घडविण्यासाठी स्पर्धा
रचनेतील दर्जा व प्रत्येक घोड्याची हालचाल याच्या परीक्षणाच्या गुणावरून अश्व भविष्यात क्रीडा क्षेत्रात योग्य असतील की त्यांची नवी पिढी घडविण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल, हे ठरते. व्यावसायिक व ब्रिडर्ससाठी या स्पर्धेमुळे घोड्याचे खूर व इतर वैशिष्ट्यांवरून त्याची योग्यता तपासण्याची संधी उपलब्ध होते. मारवाड घोड्यांचे लुप्त झालेले वैभव परत मिळवून देण्यासाठी व या प्रजातींना पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून करण्यात आला होता.