बारावी पुरवणी परीक्षेचा पहिला पेपर शांततेत
By Admin | Updated: July 10, 2016 01:12 IST2016-07-10T00:18:12+5:302016-07-10T01:12:22+5:30
बारावी पुरवणी परीक्षेचा पहिला पेपर शांततेत

बारावी पुरवणी परीक्षेचा पहिला पेपर शांततेत
नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी पुरवणी परीक्षा) प्रथम भाषेचा पेपर शांततेत पार पडला. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण १३ केंद्रांवर एक हजार १३४ विद्यार्थी बसले होते.
बारावी पुरवणी परीक्षेच्या पहिल्या दिवशी मराठी, उर्दू आदि प्रथम भाषेचे पेपर दिले. परीक्षेदरम्यान गैर प्रकार घडू नये यासाठी शिक्षण विभागाने खास खबरदारी घेतली. त्यामुळे सर्व केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडल्याची माहिती उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली. विभागीय केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक यांनी परीक्षा केंद्रावर महत्त्वाची भूमिका पार पाडून गैरप्रकार घडू नये, यासाठी प्रयत्न केले. तर विस्तार अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांसह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध परीक्षा केंद्रांवर भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या परीक्षेसाठी जिल्हाभरातून नऊ हजार १२३ विद्यार्थ्यांसह विभागातील १५ हजार ६५० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, वेगवेगळ्या २९ परीक्षा केंद्रावर ही पुरवणी परीक्षा देणार आहेत.