शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

नाशिक मुक्त विद्यापीठात पहिली ऑनलाइन पीएचडी परिक्षा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:24 IST

विद्यापीठाच्या मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या वतीने या परीक्षा घेण्यात आल्या. सध्या लॉक डाऊनमुळे पारंपरीक विद्यापीठातील कामकाज सध्या ठप्प झाले आहे

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये सातत्यराज्यातील पहिलाच प्रयोग

नाशिक : सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांचे कामकाज ठप्प झाले असताना नाशिक मधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने पीएचडीसाठी ऑनलाइन  मौखिक परीक्षा घेतलीआणि तंत्रज्ञानाच्या वापराचा आगळावेगळा प्रयोग राबविला. राज्यात अशाप्रकारे परीक्षा घेणारे हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठाच्या मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या वतीने या परीक्षा घेण्यात आल्या. सध्या लॉक डाऊनमुळे पारंपरीक विद्यापीठातील कामकाज सध्या ठप्प झाले आहे, अशावेळी नाशिकचे यशवंतरावचव्हाण महाराष्ट्र  मुुक्त विद्यापीठाच्या वतीने मात्र रेडीओ, ऑनलाइन व्हीडीओ लर्निंग सुविधेव्दारे महत्वाचे शिक्षण दिले जात आहे. त्यात आता विद्यापीठाने पीएचडीची तोंडी परीक्षा घेतली.महाराष्ट्र शासनाच्या सेवेतसचिवपदी कार्यरत असलेले अतुल पाटणे यांनी लोकाभिमुख प्रशासनात अभिनवतेची भूमिका आणि महत्व - महाराष्ट्र  शासनाच्या प्रगती अभियानासंदर्भात विशेष असा त्यांचा विषय होता. त्यांनी मुंबईहून तोंडी परीक्षा दिली. यावेळीनाशिकमध्ये ही परीक्षा घेताना मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन,मानव्य विद्याशाखेचे संचालक प्रा. उमेश राजदेरकर, डॉ. हेमंत राजगुरू , डॉ. मधूकर शेवाळे, डॉ. प्रविण घोडेस्वार, डॉ. नागार्जुन वाडेकर, डॉ. प्रकाश बर्वे आदी उपस्थित होते. या परीक्षेचे परीक्षक डॉ. श्रीमती शोभा कारेकर या पुण्यावरून, तर डॉ. बालाजी कत्तुरवार नांदेडहून सहभागी झालेहोते. यावेळी पाटणे यांनी १३५ स्लाईडव्दारे आपल्या विषयाचे सादरीकरण केले आणि आॅनलाईनच प्रश्नोत्तरे देखील झाली. सदरची परीक्षा खुली असल्याने चंदीगढ येथून आयएएस अधिकारी निलकंठ आव्हाड,मुंबई येथील सहआयुक्त अर्चना कुलकर्णी, अकोला येथील शिक्षणतज्ज्ञ प्रा.संजय खक्कर, नागपूर येथून डॉ. संजय इंगोले, मुंबई येथून डॉ. नाखले,नांदेड येथूनच डॉ. मोहन यांच्यासह एकुण ३५ जण या परीक्षेत सहभागी झालेहोते. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभय कुलकर्णी आणि चंद्रकांत पवार यांनी तांत्रिक बाजु सांभाळली.

टॅग्स :NashikनाशिकYashwantrao Chavan Maharashtra Open Universityयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठexamपरीक्षा