वादविवाद स्पर्धेत ‘मराठा’ प्रथम
By Admin | Updated: September 26, 2016 00:16 IST2016-09-26T00:14:54+5:302016-09-26T00:16:11+5:30
मालेगाव : एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक विभागीय वादविवाद स्पर्धेला प्रतिसाद

वादविवाद स्पर्धेत ‘मराठा’ प्रथम
मालेगाव : येथील मालेगाव एज्युकेशन सोसायटी (काकाणी विद्यालय) तर्फे घेण्यात आलेल्या नाशिक विभागीय वादविवाद स्पर्धेत नाशिकच्या मराठा हायस्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. तालुक्यातील मळगाव येथील केबीएच विद्यालयाने द्वितीय, तर चाळीसगाव येथील ए. बी. गर्ल्स हायस्कूलने तृतीय क्रमांक पटकावला.
येथील आयएमए हॉलमध्ये झालेल्या वाद-विवाद स्पर्धेचे उद्घाटन प्रकाश पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. आजची प्रसारमाध्यमे बेजबाबदार आहेत’ हा स्पर्धेचा विषय होता. यावेळी पाठक यांनी अथक परिश्रम, वाचन, चिंतन, मनन आणि स्मरण यामुळे वक्तृृत्व प्रभावशाली ठरते. त्यामुळे श्रोत्यांना विषयानुरूप बांधून ठेवण्याची कला साध्य होते. समयसूचकतेमुळे सभाधिटपणाची रंगत वाढत श्रोता गुंतत जातो, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विलास पुरोहित होते. प्रकल्पप्रमुख सतीश कलंत्री यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. काकाणी कन्या विद्यालयाचे पर्यवेक्षक नारायण चौधरी यांनी स्पर्धेच्या नियमांची माहिती दिली. स्पर्धेत नाशिकच्या मराठा हायस्कूलच्या श्रृती बोरसे व नेहा भंडारे यांनी प्रथम, मळगावच्या केबीएच विद्यालयाचे अतुल कदम व गीतांजली कदम यांनी द्वितीय, तर चाळीसगावच्या ए. बी. गर्ल्स हायस्कूलच्या अनुजा शिरोडे व स्वामिनी शितोळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
यश अहिरे व वैभव बच्छाव यांना उत्तेजनार्थ, तर शामल चव्हाण, श्रृती बडजाते, कृष्णा रोकडे, भावेश गोस्वामी, सिद्धी देशपांडे, प्रणव जगताप यांनीही यश मिळविले. विजेत्या स्पर्धकांना प्रथम- तीन हजार, द्वितीय- दोन हजार, तृतीय- एक हजार व उत्तेजनार्थ म्हणून ७०१ व ५०० रुपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश शिरोळे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेत १९ शाळांनी सहभाग घेतला होता.
परीक्षक म्हणून प्रा. सुरेश नारायणे, स्वाती गुजराती व बी. एस. अहिरे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन नरेंद्र गुरव व स्मीता पाटील यांनी केले. संस्थेचे सचिव नीलेश लोढा यांनी आभार मानले. यावेळी बन्सीलाल कांकरीया, विलास शहा, श्रीकांत बागडे, रामनिवास सोनी, प्रल्हाद शर्र्मा, सुभाष बाकरे, प्रकाश दातार, विजय कुलकर्णी, नितीन पोफळे, गोविंद तापडीया, भोगीलाल पटेल, रवींद्र दशपुते, अशोक मोरे, शोभा मोरे, कविता मंडळ, प्राचार्य संजय पाठक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मराठा हायस्कूलचे श्रृती बोरसे, नेहा भंडारे प्रथम
मालेगाव एज्युकेशन सोसायटी (काकाणी विद्यालय)तर्फे घेण्यात आलेल्या नाशिक विभागीय वादविवाद स्पर्धेत नाशिकच्या मराठा हायस्कूलच्या श्रृती बोरसे व नेहा भंडारे यांनी प्रथम, मळगावच्या केबीएच विद्यालयाचे अतुल कदम व गीतांजली कदम यांनी द्वितीय, तर चाळीसगावच्या ए. बी. गर्ल्स हायस्कूलच्या अनुजा शिरोडे व स्वामिनी शितोळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.