पहिल्या पुष्प उद्यानाला आले बकाल स्वरूप

By Admin | Updated: December 3, 2015 23:37 IST2015-12-03T23:36:54+5:302015-12-03T23:37:32+5:30

पहिल्या पुष्प उद्यानाला आले बकाल स्वरूप

In the first flower garden came the form | पहिल्या पुष्प उद्यानाला आले बकाल स्वरूप

पहिल्या पुष्प उद्यानाला आले बकाल स्वरूप

इंदिरानगर : नाशिक शहरातील पहिले पुष्प उद्यान म्हणून लौकिक मिळविलेल्या इंदिरानगर येथील पुष्प उद्यानाला देखभालीअभावी बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
सुमारे दीडवर्षापूर्वी सिद्धिविनायक सोसायटीतील सुमारे दोन-एक जागेत पहिले पुष्प उद्यानाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या उद्यानाची संकल्पना नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी व नगरसेवक यशवंत कुलकर्णी यांची होती. उद्यानात पागोडा आणि जॉगिंग ट्रॅकसुद्धा आहे. सध्या गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने दररोज सकाळी फेरफटका मारण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच पुष्प उद्यानात डेलिया, सदाफुली, पांढरी जास्वंदी, लाल जास्वंदी, विविध गुलाबांचे प्रकार आहेत. तसेच मध्यभागी कमळ फुलांसाठी छोटे तलावासारखे कुंड केले आहे व लॉन्स लावण्यात आले. तसेच गुलमोहराचे वृक्ष आहेत. त्यामुळे इंदिरानगरच्या सौंदर्यात भरच पडली आहे, परंतु देखभालीअभावी पालापाचोळा पडून आहे. गाजरगवतही वाढल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: In the first flower garden came the form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.