शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात पहिलाच प्रयोग : ऐतिहासिक चामुंडेश्वरी मातेचे मंदीर ‘पुरातत्व’ हुबेहुब उभारणार

By अझहर शेख | Updated: September 5, 2019 16:18 IST

तापी नदीच्या काठावर असल्यामुळे मंदिराची जमीन खचून मंदिर ढासळले. हे मंदिर यादव कालखंडात जसे होते अगदी त्याचप्रमाणे उभारण्यात येईल, असा दावादेखील पुरातत्व विभागाकडून केला जात आहे.

ठळक मुद्देचवळदे गावाच्या शिवारात चामुंडेश्वरी मातेचे पुरातन मंदिरजमीन खचल्याने मंदीराची अधिकच पडझड थ्रीडी स्कॅन, थ्रीडी इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार

अझहर शेख, नाशिक : हेमाडपंती शैलीमधील यादवकालीन चामुंडेश्वरी माता मंदिराचे काही अवशेष नदीकाठालगत आजही शिल्लक आहे. मंदिराची पडझड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दुरूस्ती करणे अशक्य आहे. त्यामुळे राज्य पुरातत्व विभाग या मंदिराचा वारसा जतन करण्यासाठी थेट हुबेहुब वास्तू दुसऱ्या जागेवर नव्याने मंदीर साकारण्यासाठी सरसावले आहे. यासाठी ‘थ्रीडी इमेज’चा वापर करण्यात येणार असून तसा प्रस्ताव पुरातत्व विभागाने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे.धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात तापीनदीच्या काठी वसलेल्या चवळदे गावाच्या शिवारात पुरातन यादवकालीन चामुंडेश्वरी मातेचे मंदिर आहे. नदीकाठाची जमीन असल्यामुळे ती पाण्याने खचल्याने मंदीराची अधिकच पडझड झाली. या मंदिराची देखणी वास्तू पडल्यामुळे हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचला जावा यासाठी, राज्य पुरातत्व विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपुर्वीच राज्य पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांच्या पथकाने पडझड झालेल्या मंदिराच्या ठिकाणी भेट देऊन सर्वेक्षण केले. या पथकाने मंदिराविषयी आवश्यक ती सर्व माहिती गोळा केली. त्यानंतर, मंदिराचे पुनरु ज्जीवन करण्यासाठी थ्री-आयामी (थ्रीडी) स्कॅन आणि थ्रीडी इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून वापरून मंदिराची रचनाकृती तयार करण्यात आलीि आहे. मंदीर पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी पथकाने तंज्ञज्ञानाचा कौशल्याने वापर केला आहे. यानुसार मंदिराची आकृती पुढे आली असून तीदेखील हेमाडपंती शैलीची भासते. मंदिराचे सुरक्षित जागेवर स्थलांतर करण्यात येणार असून त्यानुसार आवश्यक ती माहिती मिळविली जात आहे.

सुमारे दहा कोटी रूपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पुरातत्व विभागाकडून मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास उपलब्ध निधीनुसार विविध टप्प्यांमध्ये मंदिर बांधणीच्या कामाला पुरातत्व विभागाकडून सुरूवात केली जाणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी दिली.

असुरक्षित स्मारकांच्या यादीत स्थानचामुंडेश्वरी माता मंदिराचे स्थान राज्याच्या पुरातत्व विभागाच्या संरक्षित वास्तूमध्ये नाही. त्यामुळे या मंदिराची वास्तू असुरक्षित राहिली. परिणामी वेळोवेळी पडझड रोखण्यास प्रशासनालाही अपयश आले. तापी नदीच्या काठावर असल्यामुळे मंदिराची जमीन खचून मंदिर ढासळले. हे मंदिर यादव कालखंडात जसे होते अगदी त्याचप्रमाणे उभारण्यात येईल, असा दावादेखील पुरातत्व विभागाकडून केला जात आहे. यासाठी पुरातत्व विभाग मंदिराच्या रचनांचे वेगवेगळे थर थ्रीडी इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करणार आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणMaharashtraमहाराष्ट्रTempleमंदिरDhuleधुळे