‘म्हाडा’च्या तीनही योजनांची पहिली सोडत
By Admin | Updated: June 24, 2015 02:02 IST2015-06-24T02:01:54+5:302015-06-24T02:02:31+5:30
‘म्हाडा’च्या तीनही योजनांची पहिली सोडत

‘म्हाडा’च्या तीनही योजनांची पहिली सोडत
नाशिक : ‘म्हाडा’ अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अल्प, मध्यम उत्पन्न गटाच्या तीनही योजनांची पहिली सोडत आज काढण्यात आली. यामध्ये एकूण ऐंशी सदनिकांसाठी ५०२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ऐंशी व्यक्तींना सोडतीअंती लॉटरी लागली असून, उर्वरित अर्ज प्रतीक्षेत आहेत.म्हाडाने अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटासाठी ‘वन-बीएचके’च्या अनुक्रमे ३२, ८ व ‘टू-बीएचके’च्या मध्यम उत्पन्न गटासाठी ४० सदनिकांची सोडत काढण्यात आली. यावेळी कामगार कार्यालयातील उपआयुक्त संजय धुमाळ, नायब तहसीलदार संजय शिंदे, कार्यकारी अभियंता एस. पी. बोबडे, मिळकत व्यवस्थापक भिका भावसार उपस्थित होते. तीनही योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सदनिकांची अनुक्रमे प्रत्येकी बारा लाख ९४ हजार, पंधरा लाख ५१ हजार व सतरा लाख ५१ हजार रुपये लाभपात्र व्यक्तींना भरावे लागणार आहे. यासाठी चार टप्प्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा म्हाडाने उपलब्ध करून दिली आहे. अल्प उत्पन्न गटासाठी एकू ण २६५, मध्यम उत्पन्न गटासाठी १७ व दोन बीएचकेच्या मध्यम उत्पन्न गटासाठी २२० असे अर्ज प्राप्त झाले होते. सातपूर म्हाडा कॉलनीमध्ये सदनिकांचे बांधकाम सुरू आहे.